Karanja police caught a gutka of 1.15 lakhs! | कारंजा पोलिसांनी १.१५ लाखांचा गुटखा पकडला!

ठळक मुद्देकारंजा पोलिसांनी महात्मा फुले चौकस्थित एका दुकानात टाकली धाड

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड: स्थानिक शहर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून येथील महात्मा फुले चौकस्थित शाहीद पान मटेरिअल व गोळी भांडार या दुकानात धाड टाकून १ लाख १५ हजार ९00 रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई २ जानेवारीला करण्यात आली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, पोलीस निरीक्षक बोडखे, उपनिरीक्षक भगवान पायघन, कैलास ठोसरे, महेश पाटेकर, किशोर चिंचोळकर, अनिल राठोड, रामराव लडके, फिरोज खान, अश्‍विन जाधव यांच्या पथकाने शहरातील महात्मा फुले चौकातील शाहीद पान मटेरिअल व गोळी भांडार या दुकानात छापा मारला असता, त्या ठिकाणी पांढर्‍या पोत्यांमध्ये साठवून ठेवलेला गुटखा आढळून आला. त्याची किंमत १ लाख १५ हजार ९00 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी दुकान मालक इर्शाद अली रजा अली (वय ४८ वर्षे, रा. रंगारीपुरा) यास ताब्यात घेण्यात आले असून, गुटखा जप्त करण्यात आला. पुढील कार्यवाहीकरिता हे प्रकरण सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, अकोला यांच्याकडे वर्ग करण्यात आले.