भामदेवी येथील सहकारी दुध डेअरीचे उद्घाटन

By Admin | Published: April 6, 2017 01:36 PM2017-04-06T13:36:38+5:302017-04-06T13:36:38+5:30

१ हजार लिटर क्षमतेचे भामदेवी दुध उत्पादन सहकारी संस्थाचे उद्घाटन आयुक्त जे.पी.गुप्ता अमरावती यांच्याहस्ते करण्यात आले.

Inauguration of Cooperative Milk Dairy at Bhamdevi | भामदेवी येथील सहकारी दुध डेअरीचे उद्घाटन

भामदेवी येथील सहकारी दुध डेअरीचे उद्घाटन

googlenewsNext

कारंजा लाड : तालुक्यातील भामदेवी हे गाव मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत यांचे विविध विकासात्मक कामे करण्यात येत असून पशुसंवर्धन विभाग वाशिम यांच्या माध्यमातून ५६ लाभार्थ्यांना १७२ म्हशीचे वाटप करण्यात आले. यांचे १ हजार लिटर क्षमतेचे भामदेवी दुध उत्पादन सहकारी संस्थाचे उद्घाटन आयुक्त जे.पी.गुप्ता अमरावती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहूल व्दिवेदी, कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, पशुसंवर्धन उपाआयुक्त सोनोने, भुजल सर्वेक्षण विभागाचे गजभेयी, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी पवार, सरपंच सुभाष माहेकर, दुध डेअरी अध्यक्ष नामदेवआप्पा निंबलवार, आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी जलवसंर्धनाच्या कामाची पाहणी करुन केली तसेच राहूल वनाला भेट देवून २५०० नागरिकांने वृक्षारोपण केलेल्या वृक्षांची पाहणी केली व झालेल्या कामाबद्दल आयुक्त गुप्ता यांनी समाधान व्यक्त केले.त्यांनी सांगितले की, संपूर्ण गावाला नागरिकांनी सर्व राजकारण बाजुला ठेवुन एकत्र येवून आपला विकास करुन घ्यावा असे आवाहन केले. तर सर्व नागरिकांनी दुध सहकारी संस्थेत सदस्य होवून ही सहकारी संस्था यशस्वी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

Web Title: Inauguration of Cooperative Milk Dairy at Bhamdevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.