शासनाचे 'भीम अ‍ॅप' नागरिकांकडून दुर्लक्षित!

By ram.deshpande | Published: July 25, 2017 08:18 PM2017-07-25T20:18:54+5:302017-07-25T20:20:20+5:30

वाशिम : जिल्ह्यात 'भीम अ‍ॅप' दुर्लक्षित असून, नागरिक रोखीच्या व्यवहारांनाच अधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

Government's 'Bhim App' ignored by the citizens! | शासनाचे 'भीम अ‍ॅप' नागरिकांकडून दुर्लक्षित!

शासनाचे 'भीम अ‍ॅप' नागरिकांकडून दुर्लक्षित!

Next
ठळक मुद्देजानेवारी २०१७ पासून झाली 'भीम अ‍ॅप' अंमलबजावणीबँकांसोबतच जिल्हा प्रशसनानेही केले ‘अँप’च्या जनजागृतीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पैशांची देवाणघेवाण करण्यासह आॅनलाईन वस्तू खरेदीचे व्यवहार 'कॅशलेस' करण्याच्या दृष्टीने भारत सरकारचे नियंत्रण असणा-या भारतीय राष्ट्रीय भरणा कॉपोर्रेशन (एन.पी.सी.आय.) या संस्थेने 'भीम अ‍ॅप' (भारत इंटरफेस फॉर मनी) तयार केले. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जानेवारी २०१७ च्या पहिल्या आठवड्यापासून झाली. मात्र, वाशिम जिल्ह्यात आजही हे 'अ‍ॅप' नागरिकांकडून दुर्लक्षित असून रोखीच्या व्यवहारांनाच अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे.
पहिल्या टप्प्यात भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस, एचडीएफसी या बँकांना 'भीम अ‍ॅप' सेवा पुरविण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे 'अ‍ॅप' वापरण्याकरिता ग्राहकाकडे स्मार्टफोन, इंटरनेट, बँक खाते असणे आवश्यक असून खाते 'यूपीआय'शी संलग्नित असायला हवे. मात्र, यासंबंधी बँकांसोबतच जिल्हा प्रशासनानेही पुरेशी जनजागृती करण्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधूनही त्यास विशेष प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Government's 'Bhim App' ignored by the citizens!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.