कारंजा सोहळ अभयारण्यात वणवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 04:44 PM2018-11-11T16:44:12+5:302018-11-11T16:44:24+5:30

कारंजा (वाशिम) : शहरातलगत असलेल्या कारंजा-मानोरा मार्गावरील सोहळ काळविट अभयारण्यात रविवारी सकाळी अचानक वणवा पेटला. यात अभयारण्यातील गवत मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. व

Forest fire in Karanja Sohal Wildlife Sanctuary | कारंजा सोहळ अभयारण्यात वणवा 

कारंजा सोहळ अभयारण्यात वणवा 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (वाशिम) : शहरातलगत असलेल्या कारंजा-मानोरा मार्गावरील सोहळ काळविट अभयारण्यात रविवारी सकाळी अचानक वणवा पेटला. यात अभयारण्यातील गवत मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. वनकर्मचाºयांसह शेतकºयांनी तातडीने ही आग विझविली. यात गवत जळण्यापलिकडे कुठलेही नुकसान झाले नाही.
जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात वसलेल्या कारंजा सोहोळ काळवीट अभयारण्याची निर्मिती मुळात शहरानजिकच्या शेतजमिनीवर हुंदडणाºया काळविटांना हक्काचे आश्रयस्थान देण्याच्या उद्देशाने झाली. कारंजा परिक्षेत्रातील कारंजा, गिर्डा, दादगाव सोमठाणा या नियतक्षेत्रातील १ हजार ७८१.४० हेक्टर वनक्षेत्राचा अभयारण्यात समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत वनपरिक्षेत्र अधिकारी कारंजा यांच्याकडे अभयारण्याचे व्यवस्थापन आहे. कारंजा शहरापासून अवघ्या किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य वसलेले आहे. या अभयारण्यात रविवार ११ नोव्हेंअर रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अचानक वणवा पेटला. अभयारण्यातील गवत पूर्णपणे सुकले असल्याने मोठ्या प्रमाणात गवत या वणव्यात जळून खाक झाले. परिसरातील शेतकºयांसह वनविभागाच्या कर्मचाºयांनी तातडीने ही आग विझविली. यात गजानन थेर, ज्ञानेश्वर डाकोरे, गोवर्धन चोरपगार, आकाश गव्हाने या कर्मचाºयांचा समावेश होता. दरम्यान, आग वाढू नये म्हणून वनविभागाकडून कारंजा पालिकेच्या अग्नीशमनदलास पाचारण करण्यात आले होते; परंतु अग्नीशमनदलाच्या मदतीची गरजच आग विझविण्यासाठी भासली नाही.

Web Title: Forest fire in Karanja Sohal Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.