रिसोड शहरातील रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 03:19 PM2018-03-12T15:19:41+5:302018-03-12T15:19:41+5:30

रिसोड -  नगर परिषदेने १२ मार्चला रस्त्यावरील फळ व भाजीपाला विक्रेत्यांच्या गाडया हटविल्या.

The encroachment of vegetable vendors on Risod city street was deleted! | रिसोड शहरातील रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले !

रिसोड शहरातील रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले !

googlenewsNext
ठळक मुद्देरस्त्यावर पुन्हा भाजी व फळ विक्रेत्यांनी हातगाड्या मांडल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला. भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावरील आपली हातगाडे हटविले नाही तर नगर परिषदेकडून १५०० रुपयांचा दंडसुद्धा आकारला होता. नगर परिषद अध्यक्ष भारती क्षीरसागर यांनी या कामी पुढाकार घेत रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.



रिसोड -  नगर परिषदेच्या आदेशाला केराची टोपली दाखवित भाजीविक्रेत्यांनी पुन्हा एकदा रिसोड शहरातील लोणी फाटा ते आंबेडकर चौक रस्त्यालगत ‘दुकानदारी’ थाटली असल्यासंदर्भात लोकमतने १२ मार्च रोजी वृत प्रकाशित केले होते. याची दखल घेत नगर परिषदेने १२ मार्चला रस्त्यावरील फळ व भाजीपाला विक्रेत्यांच्या गाडया हटविल्या.
पूर्वी या रस्त्यावर अतिक्रमण करून भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावरच बस्तान मांडले होते. यावर कायम नियंत्रण मिळण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष यशवंत देशमुख व नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांनी भाजी विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून  समस्या संपूर्णता मिटविली होती.  यासाठी यशवंत देशमुख यांना अनेक दबावतंत्राचा वापरसुद्धा करावा लागला होता. यासाठी त्यांना नगरसेवक व  माजी नगराध्यक्ष वसंतराव इरतकर यांची मोलाची साथ मिळाली होती. यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाल्याने शहरवासियांनी सुटकेचा श्वास सोडला होता. त्यानंतर या रस्त्यावर पुन्हा भाजी व फळ विक्रेत्यांनी हातगाड्या मांडल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला. हातगाडे व भाजी विक्रेते हटविण्यासाठी स्थानिक भाजी बाजारातील विक्रेत्यांनी नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे मागणी सुद्धा केली होती. परंतु या भाजी विक्रेत्यावर कुठलाही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नव्हती. या भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावरील आपली हातगाडे हटविले नाही तर नगर परिषदेकडून १५०० रुपयांचा दंडसुद्धा आकारला होता. तशा सूचनाही काही दिवसांपूर्वी नगरपरिषदने दिल्या होत्या. या ऊपरही रस्त्यावर गाडया लावल्या जात होत्या. या संदर्भात लोकमतने १२ मार्चला वृत प्रकाशित करताच, नगर परिषद अध्यक्ष भारती क्षीरसागर यांनी या कामी पुढाकार घेत रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्या अनुषंगाने सदर मोहिम राबविण्यात आली.

Web Title: The encroachment of vegetable vendors on Risod city street was deleted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.