कालव्याच्या कामामुळे विहिर खचली; पाच वर्षांपासून नुकसान भरपाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 05:00 PM2017-12-12T17:00:18+5:302017-12-12T17:00:52+5:30

मानोरा :  धरणाचा कालवा विहिरीला लागून खोदल्याने शेतकºयाची विहिर खचली. याची नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी पाच वर्षापासून मागणी करुनही याकडे संबधित दुर्लक्ष करीत आहे.

Due to the work of canal, the well damage There is no compensation for five years | कालव्याच्या कामामुळे विहिर खचली; पाच वर्षांपासून नुकसान भरपाई नाही

कालव्याच्या कामामुळे विहिर खचली; पाच वर्षांपासून नुकसान भरपाई नाही

Next
ठळक मुद्देविहीरीचे खोदकाम व बांधकाम करुन मिळावे अशी मागणी केली आहे.लघु पाटबंधारे विभागाने या घटनेची  साधी चौकशी सुध्दा केली नाही.

मानोरा :  धरणाचा कालवा विहिरीला लागून खोदल्याने शेतकºयाची विहिर खचली. याची नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी पाच वर्षापासून मागणी करुनही याकडे संबधित दुर्लक्ष करीत आहे.

तालुक्यातील गोडेगाव धरणाचा डावा कालवा गट क्र.७६ संपादीत केलेल्या मधुन खोदावयास पाहिजे होत. पण गट क्र.७७/७८ मधुन विहीरीला लागुन खोदल्याने  शेतकºयाची  विहिर खचली.  याबाबत उमरी बु. येथील शेतकरी उदयसिंग मदन पवार  मागील पाच वर्षापासुन अनेक वेळा पत्र व्यवहार करुन देखील आजपर्यंत  लघु पाटबंधारे विभागाने या घटनेची  साधी चौकशी सुध्दा केली नाही.  

 याबाबत कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग कारंजा यांच्या सन २०१२  पासून वारंवार पत्र व्यवहार करुनही गाड झोपेत असलेले प्रशासनाने साधी चौकशी केली नाही. उलट संपादीत जमीन सोडुन दुसºया गटातुन विहीरी  जवळुन कालवा नेल्याने विहीरीचे नुकसान झाले . यामुळे शेतीपासून जे उत्पन्न होणार होते, त्यापासून शेतकरी वंचित राहिले. याबाबत संबधितांकडे  ५ जानेवारी २०१२,  २५ जुलै २०१५, २३ मार्च २०१७, ५ आॅक्टोंबर २०१७ मध्ये निवेदन दिले होते. परंतु साधी पाहणी सुध्दा केलेली नाही. असे शेतकºयांनी संबधीतांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. वरिष्ठांनी लक्ष देवून विहीरीची भरपाई देवुन, विहीरीचे खोदकाम व बांधकाम करुन मिळावे अशी मागणी केली आहे.

तक्रारी माझ्याजवळ आहे. शेतकºयांच्या जे म्हणने आहे संपादीत जमीनी व्यतिरिक्त दुसºया जमीनीमधून कालवा झाला. त्या संदर्भात पुन्हा जमीन मोजणी करुन चौकशी करु.

- व्ही. आर. चौधरी, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, कारंजा 

Web Title: Due to the work of canal, the well damage There is no compensation for five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम