पूर्णा-अकोला पॅसेंजर गाडीत घाण, दुर्गंधी; प्रवाशांचे आरोग्य धोक्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 05:08 PM2019-05-05T17:08:35+5:302019-05-05T17:08:41+5:30

वाशिम : येथील रेल्वे स्थानकावरुन अकोला - पूर्णा, अकोला , परळी या रेल्वे मार्गावर धावणाºया पॅसेंजर रेल्वे गाडीत घाण व दुर्गंधी  पसरली आहे.

Dirtyness in Purna-Akola Passenger | पूर्णा-अकोला पॅसेंजर गाडीत घाण, दुर्गंधी; प्रवाशांचे आरोग्य धोक्यात 

पूर्णा-अकोला पॅसेंजर गाडीत घाण, दुर्गंधी; प्रवाशांचे आरोग्य धोक्यात 

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम : येथील रेल्वे स्थानकावरुन अकोला - पूर्णा, अकोला , परळी या रेल्वे मार्गावर धावणाºया पॅसेंजर रेल्वे गाडीत घाण व दुर्गंधी  पसरली आहे. त्यामुळे या रेल्वेने प्रवास करणाºया हजारो रेल्वे प्रवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तथापि, रेल्वे प्रशासन गाड्यांच्या साफसफाईबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे. 
अकोला पूर्णा, व अकोला परळी, या लोह मार्गादरम्यान अकोला पूर्णा व अकोला परळी अशा चार फेºया दररोज धावत आहेत. या मार्गावरुन धावणाºया सदर रेल्वे गाडीची स्वच्छता होत नसून, यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण, कचरा, साचत आहेत. तसेच रेल्वेच्या डब्यात प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या टॉयलेट, बाथरुममध्येही पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत आहे. घाण कचºयामुळे प्रवाांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. एकिकडे पंतप्रधान देशात स्वच्छतेचे उपक्रम राबवित असतांना रेल्वे प्रशासन मात्र याकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत लक्ष देण्याची गरज असून, दक्षिण मध्य रेल्वे विभागाला रेल्वे प्रवाशाला चांगल्या सुविधा व स्वच्छता युक्त रेल्वे डब्बे, रेल्वे गाडीला जोडून या सुविधा देणे आवश्यक आहे. घाण व दुर्गंधी दूर करून प्रवाशांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.

 पॅसेंजर रेल्वे गाडीच्या डब्यांमध्ये घाण कचरा, तसेच दुर्गंधी आहे. हे खरे असले तरी वेळोवेळी रेल्वे डब्यांची नियमित स्वच्छता करण्यात येते.  रेल्वे प्रवाशांनीही स्वच्छतेच्या उपक्रमाला सहकार्य करुन रेल्वे स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.
-राजेश शिंदे, जनसंपर्क अधिकारी, दक्षिण-मध्य रेल्वे, नांदेड विभाग

Web Title: Dirtyness in Purna-Akola Passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.