दोन लाखाची मागणी पूर्ण न झाल्याने लग्नास नकार!

By admin | Published: July 12, 2017 08:24 PM2017-07-12T20:24:21+5:302017-07-12T20:24:21+5:30

सहा जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Denial of marriage due to failure of two lakhs! | दोन लाखाची मागणी पूर्ण न झाल्याने लग्नास नकार!

दोन लाखाची मागणी पूर्ण न झाल्याने लग्नास नकार!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : गॅरेज टाकण्याकरिता दोन लाख रुपये द्या; अन्यथा लग्नास नकार, अशी भूमिका घेणाऱ्या सहा जणांविरूद्ध मंगरूळपीर पोलिसांनी विविध कलमान्वये मंगळवारी गुन्हे दाखल केले.
मंगरूळपीर येथील मो.असलम मो उस्मान यांनी बहीणीच्या मुलीचा लहानपणापासून सांभाळ केला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रामपीर नगर अकोला येथे धर्म संस्कृतीनुसार विवाहासाठी स्थळ शोधले. मात्र, गॅरेज टाकण्याकरिता अश्पाक उल्ला खान याने दोन लाखाची मागणी करत थेट लग्नास नकार देवुन फसवणुक केली तसेच अश्लिल भाषेत शिविगाळ केली, अशी फिर्याद मो.असलम मो.उस्मान रा.चेहल पुरा मंगरुळपीर यांनी मंगरूळपीर पोलीस स्टेशनला दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार,  अश्पाक उला खान (२५), बरकतउल्ला खान (५३),  नसीम बानो खान (४७), नगमा अंजुम खान (२२),  नुसरत अंजुम खान (३०), अमी उल्ला खान (जफर), (२३), सर्व रा. रामपीर नगर अकोला, आदींनी ९ जानेवारी २०१७ रोजी नातेवाईकासमवेत घरी येऊन बहिणीच्या मुलीसोबत अशपाक उल्ला खान याचा साखरपुरा पार पडला. पत्रिकाही छापल्या. ईदीचे दिवशी अशपाक उल्ला खान, बरकत उल्ला खान, नसीम बानो यांनी हुंडा कमी दिला असे सांगून अशपाक उल्ला याला गॅरेज टाकण्याकरिता दोन लाख रुपये देण्याची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्यास लग्नास नकार समजण्याची भाषा वापरली. संपूर्ण परिस्थिती समजून सांगितल्यानंतरही त्यांनी काहीच ऐकले नाही, असे फिर्यादीत मो.असलम मो.उस्मान यांनी म्हटले. मो. असलम यांनी लग्नाची पूर्ण तयारी केली. मात्र, कुणीच आले नाही. वारंवार विनवणी करूनही वराकडील मंडळी आली नाही; उलट फोनवरून अश्लिल शिवीगाळ करीत लग्नास स्पष्ट शब्दात नकार दिला, असे मो. असलम यांनी फिर्यादीत नमूद केले. याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी भादंवी कलम ४०६, ४२०, १२० ब, ५०७, ३४, ४ नुसार ११ जुलै रोजी सहा जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले. पुढील तपास ठाणेदार रमेश जायभाये यांचे मार्गदर्शनात तपास अधिकारी पठाण हे करत आहेत.

 

Web Title: Denial of marriage due to failure of two lakhs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.