९० हजाराची मागितली लाच ; कारंजा शहर पोलीस स्टेशनमधील शिपायास अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 05:10 PM2018-03-05T17:10:05+5:302018-03-05T17:10:05+5:30

वाशिम : चोरीच्या मोटरसायकल गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या नाईक पोलीस शिपायाने तक्रारदारास ९० हजाराची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीच्या पथकाने सोमवारला अटक केली.

Cop arrested for taking bribe in karanja | ९० हजाराची मागितली लाच ; कारंजा शहर पोलीस स्टेशनमधील शिपायास अटक 

९० हजाराची मागितली लाच ; कारंजा शहर पोलीस स्टेशनमधील शिपायास अटक 

Next
ठळक मुद्दे अटक केलेल्या पोलीस शिपायाचे अनिल तुकाराम राठोड असे नाव आहे. वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक एन.बी. बोऱ्हाडे यांचेकडे तक्रारदार याने २३ फेबु्रवारीला तक्रार दिली.एसीबीच्या पथकाने अटक करून त्याचेविरूध्द कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

वाशिम : चोरीच्या मोटरसायकल गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या नाईक पोलीस शिपायाने तक्रारदारास ९० हजाराची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीच्या पथकाने सोमवारला अटक केली. अटक केलेल्या पोलीस शिपायाचे अनिल तुकाराम राठोड असे नाव आहे. 

वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक एन.बी. बोऱ्हाडे यांचेकडे तक्रारदार याने २३ फेबु्रवारीला तक्रार दिली. या तक्रारीमध्ये म्हटले की, मित्राने अंदाजे एक महिण्यापुर्वी मोटर सायकल ठेवून पायाचे आॅपरेशन करीता १० हजार रूपये नेले होते. तक्रारदाराचे मित्राचे पायाचे आॅपरेशन झाल्याने त्याला मोटरसायकलचे काही काम नव्हते. त्यामुळे मित्राने तक्रारदाराला आपल्या जवळील मोटरसायकल वापरण्याठी दिली. 

तथापी मित्राने तक्रारदाराला वापरण्यासाठी दिलेली मोटरसायकल ही चोरीची असल्याचे तक्रारदाराला पोलीस शिपाई राठोड याने सांगितले. लाचखोर पोलीस राठोड याने तक्रारदाराला म्हटले की, तुला मोटरसायकल चोरी मध्ये सहआरोपी करतो. जर तू १ लाख रूपये लाच देत अससीशल तर तुला आरोपी करत नाही असे म्हणून तक्रारदाराचे खिशातून १७ हजार रूपये २३ फेब्रुवारीला काढून घेतले. त्यानंतर ९० हजार रूपये घेऊन बोलावले. अशी तक्रार नोंदविली.  सदर तक्रारीवरून २३ फेबुवारी २०१८ रोजी एसीबी पथकातील पोलीस निरिक्षक बोºहाडे, जमादार दिलीप बेलोकार, विनोद सुर्वे, विनोद अवगळे, रामकृष्ण इंगळे यांचा समावेश असलेल्या पथकाने शासकीय पंचासमक्ष पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक पोलीस जमादार अनिल राठोड याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस जमादार अनिल राठोड यास तक्रारदारावर संयश आल्याने व तसा तक्रारदाराने त्यांचा जबाब दिल्यामुळे आरोपी अनिल राठोड यास एसीबीच्या पथकाने अटक करून त्याचेविरूध्द कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

Web Title: Cop arrested for taking bribe in karanja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.