वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांत ३१ हजार शेतकऱ्यांची तूर मोजण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 05:56 PM2018-05-12T17:56:20+5:302018-05-12T17:56:20+5:30

Challenge to count 31 thousand farmers' tur in two days in Washim district | वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांत ३१ हजार शेतकऱ्यांची तूर मोजण्याचे आव्हान

वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांत ३१ हजार शेतकऱ्यांची तूर मोजण्याचे आव्हान

googlenewsNext
ठळक मुद्दे६ तूर खरेदी केंद्रांवर १८ एप्रिलपर्यंतच आॅनलाइन नोंदणीचे पणन विभागाचे आदेश होते.१० मे पर्यंत वाशिम जिल्ह्यातील सहाही खरेदी केंद्रांवर मिळून ९८३५ शेतकऱ्यांची १ लाख ३५ हजार ४६० क्विंटल तुरीचीच मोजणी होऊ शकली. अद्यापही ३१ हजार २२३ शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर मोजण्याचे आवाहन प्रशासनापुढे आहे.

वाशिम: शासनाकडून देण्यात आलेल्या शासकीय तूर खरेदीची मुदतवाढ येत्या १५ मे रोजी संपत असून, वाशिम जिल्ह्यात अद्यापही ३१ हजार २२३ शेतकऱ्यां ची तूर मोजणे बाकी आहे. शनिवार, रविवार सुटीचे दिवस खरेदी बंद असल्याने उर्वरित दोन दिवसांत ही तूर मोजून घेण्याचे आव्हान प्रशासनापुढे उभे झाले आहे.  
वाशिम जिल्ह्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ६ तूर खरेदी केंद्रांवर १८ एप्रिलपर्यंतच आॅनलाइन नोंदणीचे पणन विभागाचे आदेश होते. या ठिकाणी तूर विक्रीसाठी ४१०५८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. जिल्ह्यातील चार केंद्रांवर फे ब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तूर खरेदी सुरू झाली तरी, मालेगाव आणि मानोरा येथे तूर खरेदीला सुरुवात होण्यास विलंब लागला. त्यातच ठरलेल्या मुदतीत आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकºयांची तूर मोजून घेणे प्रशासनाला शक्य झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत प्रचंड रोषाचे वातावरण निर्माण झाले. राज्यातील इतरही जिल्ह्यात हीच स्थिती असल्याने शासनाने खरेदी केंद्रांना १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली होती. तथापि, १० मे पर्यंत वाशिम जिल्ह्यातील सहाही खरेदी केंद्रांवर मिळून ९८३५ शेतकऱ्यांची १ लाख ३५ हजार ४६० क्विंटल तुरीचीच मोजणी होऊ शकली. अद्यापही ३१ हजार २२३ शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर मोजण्याचे आवाहन प्रशासनापुढे असून, ही तूर येत्या दोनच दिवसांत मोजून घ्यावी लागणार आहे.

Web Title: Challenge to count 31 thousand farmers' tur in two days in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.