बोअरवेल मशिन वाहनाचा अपघात; १० जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 05:56 PM2018-09-16T17:56:14+5:302018-09-16T17:56:55+5:30

कामरगाव (वाशिम) : वाहनावरील ताबा सुटल्याने बोअरवेल मशिन वाहून नेणाºया वाहनाचा अपघात झाल्याची घटना कामरगावपासून जवळच असलेल्या टाकळी फाट्याजवळ १६ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता घडली.

boarwell machine vehicle accident; 10 people injured | बोअरवेल मशिन वाहनाचा अपघात; १० जण जखमी

बोअरवेल मशिन वाहनाचा अपघात; १० जण जखमी

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कामरगाव (वाशिम) : वाहनावरील ताबा सुटल्याने बोअरवेल मशिन वाहून नेणाºया वाहनाचा अपघात झाल्याची घटना कामरगावपासून जवळच असलेल्या टाकळी फाट्याजवळ १६ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता घडली.
के.ए. ०१ एम.एम. ९७६७ क्रमांकाच्या ट्रकमधून बोअरवेल मशिन कारंजावरून अमरावतीकडे जात असताना, टाकळी फाट्यानजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. यामध्ये लोखंडी पाईपवर बसलेले १० मजूर जखमी झाले. त्यांना कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन अमरावती येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले. त्यापैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती. जखमींमध्ये सोनु गाषी (१८), तेजन रेयान (१५), दीपक शुक्ला (२२), नंदशी सरगत (२०), विजय प्रजापती (१५), ललीत (२२), सिकंदर (१८) व ३ अनोळखी इसमांचा समावेश आहे. अपघातग्रस्त ट्रक कर्नाटक या राज्यातील असल्यामुळे पोलिसांना जखमींची पूर्ण नावे व गावे कळु शकली नाहीत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनाली गुल्हाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे, जमादार राठोड, शामल ठाकुर, आसिफ खान करीत आहेत.

Web Title: boarwell machine vehicle accident; 10 people injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.