वाशिम जिल्ह्यात सरासरी ७३ मीमी पाऊस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 03:38 PM2018-06-09T15:38:30+5:302018-06-09T15:38:30+5:30

वाशिम - गत २४ तासांत ९ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७३ मीमी पाऊस झाल्याची नोंद असून, सर्वाधिक ११२ मीमी पाऊस मंगरूळपीर तालुक्यात तर सर्वात कमी २५ मीमी पाऊस मानोरा तालुक्यात पडला.

Average 73 mm rainfall in Washim district! | वाशिम जिल्ह्यात सरासरी ७३ मीमी पाऊस !

वाशिम जिल्ह्यात सरासरी ७३ मीमी पाऊस !

Next
ठळक मुद्दे ९ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मंगरूळपीर तालुक्यात ११२ मीमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. १ ते ९ जूनपर्यंत जिल्ह्यात ४९.१७ मीमीच्या सरासरीने एकूण २९५.०२ मीमी पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात १ ते ९ जूनपर्यंत ११९.२५ च्या सरासरीने एकूण ७१५.५० मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे.

वाशिम - गत २४ तासांत ९ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७३ मीमी पाऊस झाल्याची नोंद असून, सर्वाधिक ११२ मीमी पाऊस मंगरूळपीर तालुक्यात तर सर्वात कमी २५ मीमी पाऊस मानोरा तालुक्यात पडला.

यावर्षी वेळेवर तसेच समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस पडत आहे. ७  व ८ जून रोजी जिल्ह्यात बºयापैकी सार्वत्रिक पाऊस झाल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ९ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मंगरूळपीर तालुक्यात ११२ मीमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. वाशिम तालुक्यात ९३ मीमी, मालेगाव तालुक्यात ७५ मीमी, रिसोड तालुक्यात ४५ मीमी, कारंजा तालुक्यात ८८.२०मीमी आणि मानोरा तालुक्यात २५ मीमी पाऊस झाला. १ ते ९ जूनपर्यंत जिल्ह्यात ४९.१७ मीमीच्या सरासरीने एकूण २९५.०२ मीमी पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात १ ते ९ जूनपर्यंत ११९.२५ च्या सरासरीने एकूण ७१५.५० मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. ८ जूनच्या रात्रीदरम्यान वादळवाºयामुळे काही ठिकाणची झाडे उन्मळून पडली तर वीजपुरवठाही खंडित झाल्याचे वृत्त आहे. विशेषत: शिरपूर परिसरात वादळवाºयाचा जोर अधिक होता. 

Web Title: Average 73 mm rainfall in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.