अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचे ग्रहण सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 02:13 PM2018-10-09T14:13:35+5:302018-10-09T14:13:58+5:30

राज्यातील वाशिमसह चार आकांक्षित जिल्ह्याला या निर्बंधातून ८ आॅक्टोबरला वगळण्यात आले असून १ नोव्हेंबरपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत.

Anganwadi workers will be admitted for the vacant posts | अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचे ग्रहण सुटणार

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचे ग्रहण सुटणार

Next

वाशिम : अल्प उपस्थितीच्या अंगणवाड्यांचे एकत्रिकरण करणे, सुधारीत अंगणवाड्यांची संख्या निश्चित होईपर्यंत अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्यावर निर्बंध आहेत. तथापि, राज्यातील वाशिमसह चार आकांक्षित जिल्ह्याला या निर्बंधातून ८ आॅक्टोबरला वगळण्यात आले असून १ नोव्हेंबरपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत.
‘अंब्रेला’ एकात्मिक बालविकास सेवा योजना या मुख्य योजनेखाली राबविण्यात येणाºया ‘अंगणवाडी सेवा’ या उपयोजनेखाली यापुढे अंगणवाडी केंद्रे तसेच क्षेत्रीय कार्यालये कार्यरत राहणार आहेत. सुधारीत अंगणवाड्यांची संख्या निश्चित होईपर्यंत सेविकांची रिक्त पदे न भरण्याबाबत राज्याच्या वित्त विभागाच्या दिलेल्या सुचनेनुसार रिक्त पदांची भरती प्रक्रिया थांबलेली आहे. तथापि, आदिवासी भागातील तसेच आकांक्षित जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची रिक्त पदे भरण्याबाबत लोकप्रतिनिधींकडून शासनस्तरावर मागणी झाली होती. या मागणीची दखल घेत वाशिम, गडचिरोली, नंदूरबार व उस्मानाबाद या चार आकांक्षित जिल्ह्यातील तसेच गोंदीया, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील काही भाग, पालघर संपूर्ण जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, धारणी व चिखलदरा या तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्याला महिला व बालविकास विभागाने ८ आॅक्टोबरला हिरवी झेंडी दाखविली आहे. त्या अनुषंगाने १ नोव्हेंबरपासून भरण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

 


वाशिम जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांची जवळपास ३२ तर मदतनिसांची जवळपास ४५ पदे रिक्त आहेत. वरिष्ठांच्या सुचनेनुसार रिक्त पदे भरण्यासंदर्भात १ नोव्हेंबरपासून कार्यवाही केली जाईल.
- नितीन मोहुर्ले,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद वाशिम

Web Title: Anganwadi workers will be admitted for the vacant posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.