अकोला-वाशिम महामार्गवार अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 02:38 PM2018-07-31T14:38:49+5:302018-07-31T14:40:39+5:30

मेडशी: अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक लागून घडलेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले.

Accident on Akola-Washim highway; two seriously injured | अकोला-वाशिम महामार्गवार अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, दोन गंभीर

अकोला-वाशिम महामार्गवार अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, दोन गंभीर

googlenewsNext
ठळक मुद्देमेडशीपासून जवळच असलेल्या तलाववाडीच्या वळणावर ३१ जुलै रोजी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.दोन्ही जखमींना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.एका जखमीची ओळख पटली असून, किसन लक्ष्मण कदम रा. धमधमी, असे त्याचे नाव आहे.

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, दोन गंभीर
मालेगाव तालुक्यातील घटना: उपचारा.साठी अकोला येथे हलविले
लोकमत न्यूज नेटवर्क
मेडशी: अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक लागून घडलेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना मालेगाव तालुक्यात अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गवार मेडशीपासून जवळच असलेल्या तलाववाडीच्या वळणावर ३१ जुलै रोजी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही जखमींना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.
अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गवार मेडशीपासून जवळच असलेल्या तलाववाडीच्या वळणावर एमएच ३७, एन ८९४५ क्रमांकाच्या दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून मालेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलावून दोन्ही जखमींना अकोला येथे उपचारासाठी हलविले. त्यापैकी एका जखमीची ओळख पटली असून, किसन लक्ष्मण कदम रा. धमधमी, असे त्याचे नाव आहे. दुसºया जखमीच्या हातावर कैलास असे नाव गोंदले असले तरी, त्याची पूर्ण ओळख पटू शकली नाही. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक खंडारे, जमादार उत्तम राठोड, शिपाई आशिष बिडवे, शैलेश ठाकूर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Accident on Akola-Washim highway; two seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.