वाशिम जिल्ह्यात ७१ टंचाईग्रस्त गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:45 AM2018-04-13T01:45:24+5:302018-04-13T01:46:00+5:30

वाशिम: गतवर्षीच्या अपुर्‍या पावसामुळे जिल्ह्यात यंदा निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होत आहे. यावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासह विहिरींचे अधिग्रहणही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ७१ गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, १0 गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या आवश्यकतेनुसार अधिक वाढणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

71 wells acquired for 75 wells! | वाशिम जिल्ह्यात ७१ टंचाईग्रस्त गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण!

वाशिम जिल्ह्यात ७१ टंचाईग्रस्त गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण!

Next
ठळक मुद्देपाणीटंचाई तीव्र१0 गावांत टँकरने पाणी पुरवठा 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: गतवर्षीच्या अपुर्‍या पावसामुळे जिल्ह्यात यंदा निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होत आहे. यावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासह विहिरींचे अधिग्रहणही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ७१ गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, १0 गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या आवश्यकतेनुसार अधिक वाढणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 
वाशिम जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ८४ टक्के पाऊस पडला. त्यामुळे जलसाठे भरले नाहीत. परिणामी त्यांनी हिवाळय़ातच तळ गाठला. त्यातच भूजल पातळी पावणेदोन मीटरपेक्षा अधिक खालावल्याने कूपनलिका आणि हजारो दैनंदिन वापरातील विहिरीही आटल्याने जिल्हाभरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यात ५१0 गावांत पाणीटंचाईची समस्या आहे. यातील बहुतांश गावांसाठी स्थानिक पातळीवर पर्यायी उपाययोजना असल्या तरी, काही गावांतील स्थिती विदारक झाली आहे. पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी पर्यायी उपाय योजना आखल्या आहेत. 
त्यामध्ये प्रामुख्याने विहीर अधिग्रहणाचा समावेश असून, अत्यावश्यक बाब म्हणून टँकरचाही आधार घेतला जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७१ गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, १0 गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईची सर्वाधिक झळ वाशिम तालुक्याला बसत असल्याचे दिसत आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने इतरही उपाय योजनांची तयारी केली आहे.  

टँकरची संख्या वाढण्याची शक्यता 
सद्यस्थितीत जिल्ह्यात विहिरींच्या अधिग्रहणावर भर देण्यात येत असला तरी, विहिरींअभावी पाणीटंचाईचा सामना करणार्‍या गावांसाठी टँकरनेही पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या १0 टँकर सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये मानोरा तालुक्यात सर्वाधिक ४, तर कारंजा, वाशिम आणि मालेगाव तालुक्यात प्रत्येकी दोन टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. अद्याप रिसोड आणि मंगरुळपीर तालुक्यात टँकरची गरज भासली नाही; परंतु येत्या काही दिवसांत पाणीटंचाई तीव्र होण्याची दाट शक्यता असल्याने टँकरच्या संख्येतही वाढ होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

Web Title: 71 wells acquired for 75 wells!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.