वाशिम जिल्ह्यात तांडा वस्ती सुधार योजनेची ६२ कामे मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 02:15 PM2017-11-21T14:15:23+5:302017-11-21T14:16:14+5:30

मानोरा  : मागासलेल्या व अविकसीत तांड्यावस्तीचा विकास व्हावा तेथे मुलभुत सुविधा प्राप्त होवुन नागरिकांना दिलासा मिळावा या उद्देशाने शासनाने तांडा वस्ती सुधार योजना कार्यान्वीत केले.  

62 works sanctioned for the Tanda Vasti Improvement Scheme in Washim district | वाशिम जिल्ह्यात तांडा वस्ती सुधार योजनेची ६२ कामे मंजुर

वाशिम जिल्ह्यात तांडा वस्ती सुधार योजनेची ६२ कामे मंजुर

Next
ठळक मुद्दे३ कोटी १५ लक्ष रुपयाची तरतुद३१ तांडा व ३१ वस्ती असे मिळुन ६२ कामे मंजुर झाली.

 

मानोरा  : मागासलेल्या व अविकसीत तांड्यावस्तीचा विकास व्हावा तेथे मुलभुत सुविधा प्राप्त होवुन नागरिकांना दिलासा मिळावा या उद्देशाने शासनाने तांडा वस्ती सुधार योजना कार्यान्वीत केले.  वाशिम जिल्ह्यात या योजनेमार्फत ६२ कामे मंजुर करण्यात आली असुन त्यासाठी ३ कोटी १५ लक्ष रु पयाच्या  निधीची  तरतुद करण्यात आली अशी माहिती या समितीचे जिल्हाध्यक्ष सुनिल महाराज राठोड यांनी रविवारी १९ रोजी पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिक विश्राम भवनावर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती ते म्हणाले की, भाजपाचे  जिल्हाध्यक्ष तथा कारंजा मानोरा विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रयत्नामुळे व शासन दरबारी  सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे  वाशिम जिल्ह्यात ३१ तांडा व ३१ वस्ती असे मिळुन ६२ कामे मंजुर झाली. त्यासाठी समाज कल्याण विभागाकडून ३ कोटी १५ लक्ष रुपये निधीची  तरतुद झाली. डी.पी.डी.सी. मार्फत अडीच कोटी रुपये मंजुर झाली तसेच शासनातर्फे सुध्दा ३० टक्के कपात झाली तसेच शासनातर्फे सुध्दा अडीच कोटी रुपये मंजुर झाले होते. त्यातील ३० टक्के  कर्जमाफीसाठी कपात करण्यात आले. पाच कोटी रुपायतील ६० टक्के रक्कम कपात झाली, उर्वरीत ३ कोटी १५ लाखाचा निधी या कामासाठी मंजुर आहे. सदर कामाचे  इस्टमेट तयार करुन संबंधीत  गावाच्या ग्रामपंचायतीने कामे त्वरित सुरु करावी असेही ते म्हणाले. ही कामे ज्या तांड्यात वस्तीत करयाची आहे तेथे नामफलक लावावा , जेथे नामफलक दिसणार नाही तेथील अंतीम देयक मिळणार नाही. अशा सुचना आपण केल्या आहेत. ज्या तांउ्यात वस्तीत गरज आहे तेथेच ही कामे आमदार राजेंद्र पाटणी यांचे मार्गदर्शनात टाकण्यात आली आहेत. तांड्यावस्तीत एखाद्या सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी जागा नसते म्हणुन प्राधान्यक्रम हा सभागृह बांधण्यावर दिला आहे.त्यासाठी गावाच्या ग्रामसेवकांनी तसे प्रस्ताव सादर केले पाहिजे. सदरहु कामे दर्जेदार व्हावीत असा आग्रह आमचा आहे असेही सुनिल महाराज यांनी सांगितले. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्यानंतर  तांड्याचा  वसतीचा चेहरामोहरा बदलणार आहे.  पत्रकार परिषदेला भाजपाचे तालुकाअध्यक्ष ठाकुरसिंग चव्हाण, संगायोचे  अध्यक्ष निळकंठ पाटील, डॉ.अविनाश  लोथे, वाईगौळचे उपसरपंच जयसिंग राठोड, शेखर जाधव आदि उपस्थित होते.

Web Title: 62 works sanctioned for the Tanda Vasti Improvement Scheme in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.