५२ ‘लोटा’बहाद्दरांकडून ६२ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:15 AM2017-08-17T01:15:09+5:302017-08-17T01:16:21+5:30

शिरपूर जैन : जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकाने शिरपूर परिसरात बुधवारी पहाटे ४ वाजतापासून राबविलेल्या धडक मोहिमेत ७५ ‘लोटा’बहाद्दरांना पकडले. यापैकी ५२ जणांकडून प्रत्येकी १२00 रुपयांप्रमाणे एकूण ६२ हजार ४00 रुपयांचा दंड ऑन दी स्पॉट वसूल केला, तर उर्वरित २३ जणांना तातडीने दंड जमा करण्याची सक्त ताकीद दिली.

52 'Lotus' recovered fine of 62 thousand | ५२ ‘लोटा’बहाद्दरांकडून ६२ हजारांचा दंड वसूल

५२ ‘लोटा’बहाद्दरांकडून ६२ हजारांचा दंड वसूल

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकाने राबविली मोहीम ५२ जणांकडून वसूल केला ६२ हजार ४00 रुपयांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकाने शिरपूर परिसरात बुधवारी पहाटे ४ वाजतापासून राबविलेल्या धडक मोहिमेत ७५ ‘लोटा’बहाद्दरांना पकडले. यापैकी ५२ जणांकडून प्रत्येकी १२00 रुपयांप्रमाणे एकूण ६२ हजार ४00 रुपयांचा दंड ऑन दी स्पॉट वसूल केला, तर उर्वरित २३ जणांना तातडीने दंड जमा करण्याची सक्त ताकीद दिली.
गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी गुड मॉर्निंंग पथकाने पोलीस, होमगार्डच्या सहकार्याने सहा वाहनांचा ताफा घेऊन शिरपूर येथे बुधवारी पहाटेच्या दरम्यान विशेष मोहीम राबविली. यावेळी उघड्यावर शौचास जाणार्‍या ७५ लोकांना पकडले. त्यांना शिरपूर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. यावेळी ५२ व्यक्तींकडून प्रत्येकी १२00 रुपयांप्रमाणे एकूण ६२,४00 रुपये रोख स्वरूपात दंड वसूल केला. ज्यांच्याकडे पैसे उपलब्ध नव्हते, अशा उर्वरित २३ लोकांना लवकरात लवकर दंड भरण्याचे निर्देश दिले. दंड न भरणार्‍यांवर पोलीस कारवाईचे पोलिसांना लेखी निवेदन देण्यात आले. ही मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्या नेतृत्वात जिल्हा स्वच्छता कक्ष व पंचायत समितीच्या पथकाने राबविली. दरम्यान, एका ग्रामपंचायत कर्मचार्‍यालादेखील शौच करताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून १२00 रुपये दंड वसूल करण्यात आला.
या पथकामध्ये मग्रारोहयोचे गटविकास अधिकारी संदीप कोटकर, स्वच्छ भारत मिशन कक्षाचे राजू सरतापे, प्रफुल्ल काळे, शंकर आंबेकर, राम शंृगारे, विस्तार अधिकारी सोलव, पुष्पलता अफुणे, अमित घुले, विजय नागे, प्रदीप सावळकर, रविचंद्र पडघान, गटसमन्वयक महादेव भोयर, अभय तायडे, ज्ञानेश्‍वर महल्ले, सदानंद राऊत, सुखदेव पडघान, दत्ता चव्हाण यांच्यासह शिरपूर ग्रा.पं.चे कर्मचारी पिरू रेघीवाले, महावीर बेलोकार, खडसे, संजय देशमुख, राजू भांदुर्गे, राजू जोशी इतर अधिकारी-कर्मचारी यांनी भाग घेतला. दरम्यान, सकाळच्या वेळी अनेक गोरगरीब नागरिकांकडे दंडाची १२00 रुपयांची रक्कम नसल्याने धावपळ उडाली. अनेकांनी या दंडात्मक कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली.

Web Title: 52 'Lotus' recovered fine of 62 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.