वाशिम जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांसाठी ३१ पोकलेनचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 01:28 PM2018-11-30T13:28:29+5:302018-11-30T13:28:56+5:30

कठीण खडक असल्याने खोदकाम करण्यासाठी पोकलेनची आवश्यकता असल्याने बीजेएसच्यावतीने पोकलेन मशीनसाठी प्रस्ताव मागण्यात आले होते.

31 Pokleon proposal for water conservation work in Washim district | वाशिम जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांसाठी ३१ पोकलेनचे प्रस्ताव

वाशिम जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांसाठी ३१ पोकलेनचे प्रस्ताव

googlenewsNext

निवड प्रक्रिया: खोदकामाची समस्या सुटणार 
वाशिम: जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) पुढाकारातून जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्याचा भूस्तर पाहता काही ठिकाणी कठीण खडक असल्याने खोदकाम करण्यासाठी पोकलेनची आवश्यकता असल्याने बीजेएसच्यावतीने पोकलेन मशीनसाठी प्रस्ताव मागण्यात आले होते. या अंतर्गत बीजेएसच्या जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाकडे ३१ अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने बीजेएसच्या जिल्हा समन्वयकांना २२ नोव्हेंबर रोजी पत्र पाठवून जिल्ह्यासाठी ३० पोकलेन मशीन उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. 
राज्यशासन आणि बीजेएसच्या पुढाकाराने जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नाला खोलीकरण, शेततळे, वनतळे, खोल समतल चरसह नदी खोलीकरणही करण्यात येत आहे. कृषी विभागासह पाटबंधारे विभाग आणि महसूल विभागाच्यावतीने ही कामे करण्यात येत असून, कामांसाठी ग्रामपंचायतींचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात रिसोड वगळता वाशिम, मानोरा, मंगरुळपीर, कारंजा आणि मालेगाव या पाचही तालुक्यात ही कामे वेगाने करण्यात येत आहेत. जिल्ह्यात या कामांसाठी बीजेएसने २८ जेसीबी मशीनही उपलब्ध केल्या आहेत. तथापि, जिल्ह्यातील जमिनीत पाच ते सहा फुटानंतर कठीण खडक लागतो. सुजलाम, सुफलाम अंतर्गत करण्यात येणारे खोल सलग समतल चर, शेततळे, वनतळे, नाला खोलीकरण आदिंसह इतर कामांसठी पोकलेनची आवश्यकता होती. पोकलेनअभावी निर्माण झालेली अडचण दूर करण्यासाठी  जिल्हा प्रशासनाने बीजेएसचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा यांना २२ नोव्हेंबर रोजी पत्र सादर करून  ३० पोकलेन मशीन उपलब्ध करण्याची मागणी केली होती. आता वाशिम जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातून ३१ पोकलेन मशीनचे प्रस्ताव बीजेएसच्या जिल्हा व्यवस्थापकांकडे आले असून, या अर्जांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील रखडलेली खोदकामे मार्गी लागणार आहेत. 

जिल्ह्यातील मशीनधारकांचा अल्प प्रतिसाद
सुजलाम, सुफलाम अंतर्गत जलसंधारणाची कामे करण्यासाठी पोकलेन आवश्यक असल्याने बीजेएसकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. बीजेएसच्या आवाहनाला बीड, गेवराई, पुणे, बारामती, नंदूरबार आदि लांबवरच्या जिल्ह्यातील पोकलेनधारकांनी वाशिम जिल्ह्यात मशीन देण्यास उत्सुकता दर्शविली; परंतु वाशिम जिल्ह्यातील पोकलेनधारकांकडून मात्र केवळ दोनच प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे या कामांसाठी जिल्ह्यातील पोकलेनधारकांना प्राधान्य देण्याचे बीजेएसने ठरविले आहे.

Web Title: 31 Pokleon proposal for water conservation work in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.