वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देताे म्हणून १३.५० लाखाने फसवणूक

By नंदकिशोर नारे | Published: March 15, 2024 02:49 PM2024-03-15T14:49:27+5:302024-03-15T14:49:31+5:30

तीन जणांवर गुन्हा दाखल, तुम्ही मला मुलीचे शिक्षणाचे प्रमाणपत्र व कागदपत्र द्या असे म्हणत कौन्सिलिंग म्हणून फिर्यादीकडून वेगवेगळ्या पद्धतीने पैसे मागून १३ लाख ५० हजार रुपयाची फसवणूक केली.

13.50 lakh fraud for getting admission in medical college | वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देताे म्हणून १३.५० लाखाने फसवणूक

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देताे म्हणून १३.५० लाखाने फसवणूक

वाशिम : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने १३.५० लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी १४ मार्च रोजी तीन जणांवर गुन्हा दाखल केला .

मोहम्मद जाकीर मोहम्मद इसहाक (वय ५४), रा.पठाणपुरा मंगरूळपीर यांनी पाेलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार दिली  आरोपी डॉ. सय्यद एहतेशाम अली (वय ३५), डॉ. आयेशा इनामदार सय्यद एहतेशाम अली (वय ३०), मो. महेबूब उर्फ वसीम (वय २७) वर्ष रा. गांधी हॉस्पिटल हैद्राबाद, तेलंगणा यांनी ४ ऑगस्ट २०२३ ते २ डिसेंबर २०२३  दरम्यान फिर्यादीचे मुलीचे वैद्यकीय महाविद्यालय हैदराबाद तेलंगणा येथे ऍडमिशन होऊन जाईल असे सांगितले.  तुम्ही मला मुलीचे शिक्षणाचे प्रमाणपत्र व कागदपत्र द्या असे म्हणत कौन्सिलिंग म्हणून फिर्यादीकडून वेगवेगळ्या पद्धतीने पैसे मागून १३ लाख ५० हजार रुपयाची फसवणूक केली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 13.50 lakh fraud for getting admission in medical college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.