‘कॅच द रेन’ मोहिमेंतर्गत ११.५५ लाख कामे पूर्ण, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By संतोष वानखडे | Published: October 10, 2022 04:30 PM2022-10-10T16:30:49+5:302022-10-10T16:34:12+5:30

सभेला उपस्थित विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या कामाची माहिती दिली.

11.55 lakh works completed under 'Catch the Rain' campaign, Collector reviewed | ‘कॅच द रेन’ मोहिमेंतर्गत ११.५५ लाख कामे पूर्ण, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

‘कॅच द रेन’ मोहिमेंतर्गत ११.५५ लाख कामे पूर्ण, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Next

वाशिम - केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाच्या ‘कॅच द रेन’ मोहिमेचा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.यांनी १० ऑक्टोबर रोजी वाकाटक सभागृहात आढावा घेतला. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात जलसंधारणाची १ लाख ३१ हजार ६१० कामे आणि वृक्ष लागवडीची १० लाख २४ हजार १५३ कामे अशी एकूण ११ लाख ५५ हजार ७६३ कामे पूर्ण झाली आहे.

आढावा सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व उपवनसंरक्षक शैलेश मीणा यांची प्रमुख उपस्थिती होती. शण्मुगराजन म्हणाले, विविध यंत्रणांनी या मोहिमेंतर्गत जी कामे केली आहेत,ती कामे संबंधित पोर्टलवर अपलोड करण्यात यावी. ज्या यंत्रणांनी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही, त्यांनी तातडीने उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी नानोटकर यांनी आतापर्यंत ‘कॅच द रेन’ मोहिमेअंतर्गत झालेल्या कामांची माहिती दिली.या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात यंत्रणांनी बाबनिहाय १ लाख ३१ हजार ६१० कामे आणि वृक्ष लागवडीची १० लाख २४ हजार १५३ कामे अशी एकूण ११ लाख ५५ हजार ७६३ कामे केल्याचे सांगितले. 

सभेला उपस्थित विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या कामाची माहिती दिली. सभेला भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ वैज्ञानिक एस.एस.कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) दिगंबर लोखंडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के.वानखेडे, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी.एस. खारोळे यांचेसह सर्व गटविकास अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

३० नोव्हेंबरपूर्वी उद्दिष्टपूर्ती करावी

प्रत्यक्षात झालेली कामे व अपलोड केलेली कामे यामध्ये तफावत दिसू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. झालेली कामे ऑनलाईन ऑफलाईन भरण्यात यावी. ३० नोव्हेंबरपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामुळे झालेली कामे तातडीने पोर्टलवर अपलोड करावी. ३० नोव्हेंबरपर्यंत उद्दिष्टपूर्ती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले.
 

Web Title: 11.55 lakh works completed under 'Catch the Rain' campaign, Collector reviewed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.