वसईतील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी केली ‘सौरकार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 02:04 AM2019-04-18T02:04:57+5:302019-04-18T02:05:01+5:30

आशिया खंडातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणा-या ‘सोलर-व्हेईकल इलेक्ट्रिक चॅम्पिअनशिप’-२०१९ या स्पर्धेत वसईतील विद्यावर्धीनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या संघाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

Vasari Engineering students organized 'Solarcars' | वसईतील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी केली ‘सौरकार’

वसईतील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी केली ‘सौरकार’

Next

वसई : सौरऊर्जेवर चालणाऱ्या गाडयांची आशिया खंडातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणा-या ‘सोलर-व्हेईकल इलेक्ट्रिक चॅम्पिअनशिप’-२०१९ या स्पर्धेत वसईतील विद्यावर्धीनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या संघाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
२५ मार्च ते ३१ मार्च-२०१९ दरम्यान चंदीगड विद्यापिठात इंपिरियल सोसायटी आॅफ इनोव्हेटीव्ह इंजिनियर्स या जागतिक पातळीवरील संस्थेने आयोजित केलेल्या या आशियायी स्पर्धेत सहभागी झालेल्या शेकडो संघांनी सौरऊर्जेवर चालणाºया कारची निर्मिती केली होती. त्यांचे येथे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
यावेळी वाहन निर्मितीसाठी निश्चित केलेले सर्व निकष पूर्ण करणाºया कॉलेजच्या संघाला या शर्यतीत पहिला, दुसरा आणि तिसरा संघ म्हणून विजेता-उपविजेता घोषित केले जाते. या स्पर्धेत आशिया खंडातील विविध महाविद्यालयांचे एकूण ४४० संघ सहभागी झाले होते. यामध्ये राज्यातील ६० संघामधून वसईतील विद्याविर्धनी कॉलेजच्या संघाने तिसरा क्र मांक पटकावून जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे.
>कशी आहे सौरऊर्जेवरील गाडी
विद्याविर्धनीच्या १७ विद्याथी व शिक्षक-मार्गदर्शक वर्गांनी मेहनतीने तयार केलेल्या सौरऊर्जेवरील गाडीची किंमत ३.२ लक्ष रु पये जरी असली तरी या वाहनाच्या निर्मितीला काही वैयित्तक व कॉलेजचे योगदान, त्यांचा निधी व काही प्रयोजकांचे अर्थसहाय्य यातून ही कार साकारली.
>विद्याथ्यांनी व्यवसाय व आपल्यातील कला गुणांना वाव देणे हि काळाची गरज असून स्वत: निर्मिती क्षेत्रात पुढे जावे तथा नवा उद्योग-धंदा शिक्षण झाल्यावर सुरु करावा, या संकल्पनेतूनच कॉलेजमध्ये इ सेल ची स्थापना झाली, यामध्ये विद्याथी आणि त्याच्या मनातील अभियांत्रिकी संकल्पना व नवे तंत्रज्ञान साकारले जाते. त्यासाठी आज त्यांना आम्ही हे प्रशिक्षण देतो
- डॉ.एच व्ही वणकुन्द्रे, प्राध्यापक, विद्यावर्धिनी महाविद्यालय, वसई
या संघात विद्याविर्धनी कॉलजेचे प्राध्यापक डॉ. हरीश वणकुन्द्रे , प्रभारी कर्मचारी स्वप्नील माने, महिला सहकारी दीप्ती पटणे आणि या टीमचा कर्णधार मितेश सावंत आणि इतर सहभागी होते. या सर्वांनी मागील वेळी १९ वा क्र मांक पटकावला होता मात्र यंदा थोडे बदल करून या सौरऊर्जेवरील गाडीच्या उपप्रणालींचा अभ्यास करून चेसीस, ब्रेक्स, सस्पेंशन स्टीयरिंग यात बदल केले.वाहनाचे वजन
-१७२ किलो
श्रेणी -(एकदा बॅटरी चार्ज केल्यावर ) ८० किमी वाहन धावते.
हे वाहन सौर उर्जेवर हि चालते
बॅटरी सॉकेटमधून चार्जिंगसाठी -४ तास लागतात
सौर पॅनल मधून बॅटरी चार्जिंगसाठी - ८ तास

Web Title: Vasari Engineering students organized 'Solarcars'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.