वसई-विरार महापलिकेचा ग्रामस्थांना करवाढ झटका, ४० टक्के घरपट्टी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 05:41 AM2017-12-10T05:41:19+5:302017-12-10T05:41:29+5:30

ग्रामपंचायतीतून महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये वसई विरार महापालिकेने ४० टक्के करवाढ केली आहे. टप्याटप्याने हीच करवाढ शहरी भागाप्रमाणेच केली जाणार आहे.

 Vasai-Virar Municipal corporation's tax havens, 40 percent housework increase | वसई-विरार महापलिकेचा ग्रामस्थांना करवाढ झटका, ४० टक्के घरपट्टी वाढ

वसई-विरार महापलिकेचा ग्रामस्थांना करवाढ झटका, ४० टक्के घरपट्टी वाढ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : ग्रामपंचायतीतून महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये वसई विरार महापालिकेने ४० टक्के करवाढ केली आहे. टप्याटप्याने हीच करवाढ शहरी भागाप्रमाणेच केली जाणार आहे. दुसरीकडे, शिक्षण कर, विश्ोष स्वच्छता कर आणि इतर मालमत्ता करा इतक्याच रक्कमेची बिले इतर कराची म्हणून पाठवून गोंधळ उडवून दिला आहे.
५३ गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आल्यानंतर वसईत मोेठे आंदोलन उभे राहिले होते. महापालिका विरोधात त्यावेळी घरपट्टीत मोठी वाढ होईल, असाही महत्वाचा मुद्दा होता. तेव्हा गावातील घरपट्टी वाढणार नाही, अशी ग्वाही सत्ताधाºयांकडून देण्यात आली होती. तर २९ गावे वगळण्याचे सध्या न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणात ही गावे सामावून घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारची करवाढ केली जाणार नाही असेही आश्वासन सत्ताधाºयांकडून देण्यात आले होते. मात्र, सत्ताधाºयांचा हा दावा आता फोल ठरला आहे.
महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांसाठी केलेली करवाढ शासनाच्या धोरणानुसारच करण्यात आल्याचे आता महापालिकेकडून सांगितले जात आहे. यंदा ४० टक्के करवाढ करण्यात आलेली आहे. यापुढे टप्याटप्याने करवाढ केली जाणार आहे. पुढील वर्षी ६० टक्के, त्यानंतर ८० टक्के आणि शेवटी १०० टक्के वाढीव कर आकारण्यात येणार आहे. शहरातील इतर नागरीकांकडून जसा कर आकारला जातो, त्याच पद्धतीने गावांमध्ये कर आकारण्यात येणार आहे. यावर्षीपासून गावकºयांना सध्यापेक्षा दुप्पट कराची बिले पाठवण्यात आल्याने गावकरी अस्वस्थ झाले आहेत.
या वाढीव घरपट्टीला गावातून आता विरोधाचा सूर निघू लागला आहे. माजी नगरसेविका फ्लेविना पेगाडो, भाजपा जिल्हा सरचिटणीस रिक्सन तुस्कानो, भाजपा अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष विजय तुस्कानो, डेरीक डाबरे, एवरेस्ट डाबरे यांनी घरपट्टी भरू नये, असे आवाहन गावकºयांना केले आहे.
दुसरीकडे, मालमत्ता कराच्या बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यात आल्याने लोकांमध्येही नाराजी उमटू लागली आहे. करदात्यांना पाठवलेल्या बिलामध्ये घरपट्टी रकमेच्या ५० टक्के इतका शिक्षण कर, विशेष स्वच्छता कर व इतर कर मिळून मालमत्ता करा इतकीच रक्कम इतर कर म्हणून आकारण्यात आली आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांना दुप्पटीहून अधिक रकमेची बिले पाठवून घरपट्टी विभागाने गोंधळ घातल्याची तक्रार भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी केली आहे.
महापालिकेने करदात्यांना दिलेली चुकीची बिले तातडीने परत घ्यावीत. ज्यांनी जास्त रक्कम भरली आहे, त्यांना पुढील बिलामध्ये वाढीव रकमेचा परतावा द्यावा. या गोंधळास जबाबदार असणाºयांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Web Title:  Vasai-Virar Municipal corporation's tax havens, 40 percent housework increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.