आदिवासी विद्यार्थ्याचा सूत्रकारला सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 02:47 AM2017-12-30T02:47:17+5:302017-12-30T02:47:20+5:30

तलासरी तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्पाच्या शासकीय आश्रम शाळा सूत्रकार मधील इयत्ता आठवीत शिकणारा आदिवासी विद्यार्थी रघुनाथ लखमा पाटकर (१४) यांचा शाळेतून घरी जाताना सर्पदंशाने दुर्देवी मृत्यू झाला.

Tribal student scientist dies of snake mass | आदिवासी विद्यार्थ्याचा सूत्रकारला सर्पदंशाने मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्याचा सूत्रकारला सर्पदंशाने मृत्यू

Next

सुरेश काटे 
तलासरी : तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्पाच्या शासकीय आश्रम शाळा सूत्रकार मधील इयत्ता आठवीत शिकणारा आदिवासी विद्यार्थी रघुनाथ लखमा पाटकर (१४) यांचा शाळेतून घरी जाताना सर्पदंशाने दुर्देवी मृत्यू झाला. रघुनाथ यास वेळीच योग्य उपाचार मिळाले असते तर त्याचा मृत्यू टाळता आला असता यात आदिवासी विकास विभागाचा अधिकाº्यांचेही दुर्लक्ष केले
रघुनाथचा मृत्यू अंधश्रद्धेने केलेल्या उपचारा मुले झाल्याची चर्चा सूत्रकार गावात सुरू असून या बाबत मात्र रघुनाथाचे वडील लखमा पाटकर यांनी याचा इन्कार करून त्याला वेळीच रु ग्णालयात दाखल केल्याचे सांगितले मंगळवारी २० डिसेंबर रोजी तो सूत्रकार आश्रम शाळेतून घरी लाखनपाडा येथे जात असतांना त्याला सर्पदंश झाला ही गोष्ट त्याने घरच्यांना सांगताच त्याला तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले २१ तारखेला त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यास सिल्व्हासा येथे अधिक उपचार करिता दाखल केले त्याच्यावर उपचार सुरू असतांना त्याचा बुधवारी दुर्देवी मृत्यू झाला. त्याला सिल्व्हासा येथे दाखल केल्यावर पैशासाठी त्यांच्या वडिलांची वणवण सुरू होती या वेळी मात्र आदिवासी विकास विभागाचा एकही अधिकारी रुग्णालयाकडे फिरकला नाही मात्र त्याच्या मृत्यूनंतर जागे झालेल्या अधिकाº्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

Web Title: Tribal student scientist dies of snake mass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.