गाडीतून लाखो रूपयांची बॅग पळवणारे तीन आरोपींना गुजरातमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 09:41 PM2024-02-20T21:41:55+5:302024-02-20T21:42:36+5:30

या आरोपीकडून तीन गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेल्या रकमेपैकी ९ लाख ५ हजारांची रोख रक्कम हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे.

Three accused who stole a bag worth lakhs of rupees from the car were arrested from Gujarat | गाडीतून लाखो रूपयांची बॅग पळवणारे तीन आरोपींना गुजरातमधून अटक

गाडीतून लाखो रूपयांची बॅग पळवणारे तीन आरोपींना गुजरातमधून अटक

मंगेश कराळे -

नालासोपारा - वसईत एका कंपनीची लाखो रूपयांची बॅग गाडीतून पळवणारे तीन आरोपी गुजरातच्या सुरेंद्रनगर येथून अटक करण्यात वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. या आरोपीकडून तीन गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेल्या रकमेपैकी ९ लाख ५ हजारांची रोख रक्कम हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे.

१४ फेब्रुवारीला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सलमान सुपारी स्टोअर्स ते रेंजनाका सिग्नल दरम्यान उत्तम वजाळ (२९) हे काम करत असलेल्या जितेंद्र कार्पोरेशन कंपनीची १५ लाख ९९ हजार १३३ रुपयांची रोख रक्कम असलेली गाडीच्या पाठीमागे कुलूप लावून ठेवली होती. चोरट्याने गाडीच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून रोख रक्कम असलेली बॅग चोरून नेली होती. याप्रकरणी वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी से मुंबई, ठाणे, नवी मुंवई, वसई परिसरामध्ये वारंवार अशाप्रकारचे गुन्हे करत असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास आरोपींचा शोध घेण्यावाचत मार्गदर्शक सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या व तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपींना निष्पन्न केले. आरोपी निलेश ऊर्फ पोया धरमशी बुटीया (३६), दिलीप ऊर्फ कालीया करसन भोगीया (२८) आणि भरत ऊर्फ मिडीया चिरु बुटीया (३८) या तिघांना  गुजरात राज्यातील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील लिंबडी या गावातून सापळा रचुन शिताफीने अटक केली आहे. अटक आरोपीत यांनी आयुक्तालयात अशाचप्रकारचे अनेक गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आयुक्तालयातील ३ गुन्ह्यांची उकल करून आरोपींकडून एकुण ९ लाख ५ हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे. 

वरील कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहायक पोलीस आयुक्त उमेश माने पाटिल, वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे)  जिलानी सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सपोनि सचिन सानप, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळू कुटे, अभिजीत गढरी यांनी केली आहे.
 

Web Title: Three accused who stole a bag worth lakhs of rupees from the car were arrested from Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.