इंग्रजीचा पाया पक्का करण्यासाठी शिक्षकांना धडे; नरेशवाडी येथे प्रशिक्षण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 03:16 AM2018-02-15T03:16:21+5:302018-02-15T03:16:31+5:30

डहाणू तालुक्यातील नरेशवाडी येथील सोमय्या विद्यालयात माध्यमिक शिक्षकांचे इंग्रजीचे शिबिर आयोजित केले होते. औरंगाबाद येथील प्रादेशिक विद्या प्राधिकरण व आंग्ल भाषा व तज्ञत्व या संस्थेतर्फे चेस या उपक्रमांतर्गत हे प्रशिक्षण आयोजित केले होते.

 Teachings to educate teachers to support English; Training camp at Nareshwadi | इंग्रजीचा पाया पक्का करण्यासाठी शिक्षकांना धडे; नरेशवाडी येथे प्रशिक्षण शिबिर

इंग्रजीचा पाया पक्का करण्यासाठी शिक्षकांना धडे; नरेशवाडी येथे प्रशिक्षण शिबिर

googlenewsNext

- शशिकांत ठाकूर

कासा : डहाणू तालुक्यातील नरेशवाडी येथील सोमय्या विद्यालयात माध्यमिक शिक्षकांचे इंग्रजीचे शिबिर आयोजित केले होते. औरंगाबाद येथील प्रादेशिक विद्या प्राधिकरण व आंग्ल भाषा व तज्ञत्व या संस्थेतर्फे चेस या उपक्रमांतर्गत हे प्रशिक्षण आयोजित केले होते.
विद्या प्राधिकरणाच्या पुढाकाराने माध्यमिक शिक्षकांना इंग्रजी विषयासाठी प्रशिक्षण देण्यात आले असून या आधी तलासरी व डहाणू तालुक्यातील इंग्रजीच्या शिक्षकांच्या सहा सभा आयोजित केल्या होत्या. जागतिक पातळीवरील इंग्रजी शिकविण्याच्या पद्धती, शैक्षणिक साहित्य, अत्याधुनिक अभ्यासक्रमाचे अध्ययन कसे करायचे, भाषा विकास, वर्ग व्यवस्थापन याबाबत या शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शिक्षकांमध्ये भाषिक कौशल्याचा विकास, व्यावसायिक विकास, टेक्नोसॅव्ही होणे, नव्या क्षमता विकसित करणे, सोशल मिडियाचा अध्यापनासाठी वापर करणे आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिरात तलासरीतून १६ तर डहाणूमधून ४२ इंग्रजी शिक्षकांनी भाग घेतला होता. यास चेतनकुमार पाटील व महेश महाले यांनी मार्गदर्शन केले.
मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना इंग्रजीची वाटणारी भीती दूर व्हावी, जागतिक भाषा सहज सोपी वाटावी, म्हणून शिक्षण विभागाने चेस (कन्टीन्यूअस हेल्थ टू द टिचर्स आॅफ द इंग्लिश फॉर सेकंडरी स्कूल्स) या उपक्रमाचा आराखडा तयार केला आहे. त्यात १५ हजार शिक्षकांना अध्यापनाचे धडे दिले जातील ३६ जिल्ह्यामध्ये ४३३ इंग्लिश टिचर्स फोरमच्या मोडरेटर्सच्या साह्याने हे कार्य सुरू आहे.

इयत्ता ९ वी व १० वीचा विचार
या शिबिरांचा ३० लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. शालेयस्तरांवर गणित व इंग्रजीची विद्यार्थ्यांना भीती असते. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांना आधी विषयाचे धडे दिले जाणार आहेत. त्यानुसारच त्यांनी अध्यापन करायचे आहे. ९ वी १० वी च्या विर्द्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प केला आहे.

शनिवार ‘इंग्लिश डे’
दरम्यान इंग्लिश विषयाचे महत्त्व वाढविण्यासाठी शाळेत आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा इंग्लिश डे असेल या दिवशी प्रार्थना, परिपाठ इंग्रजीतून करणे. शिक्षकांनी विद्यार्थी व सहकाºयांशी इंग्रजीतूनच संवाद साधणे, विद्यार्थ्यांनी इंग्रजी बोलण्याचा जास्तीत जास्त सराव करणे अपेक्षित आहे.

Web Title:  Teachings to educate teachers to support English; Training camp at Nareshwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.