लोकमतच्या राहुल वाडेकर यांना समर्थनचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 05:45 AM2017-12-10T05:45:41+5:302017-12-10T05:45:52+5:30

लोकमतचे येथील स्ट्रींगर राहुल वाडेकर यांना मानवी हक्क रक्षणार्थ केलेल्या पत्रकारितेबद्दल समर्थनचा २०१६ चा पुरस्कार प्रदान करण्यांत आला.

 Support for Lokmat's Rahul Wadekar | लोकमतच्या राहुल वाडेकर यांना समर्थनचा पुरस्कार

लोकमतच्या राहुल वाडेकर यांना समर्थनचा पुरस्कार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : लोकमतचे येथील स्ट्रींगर राहुल वाडेकर यांना मानवी हक्क रक्षणार्थ केलेल्या पत्रकारितेबद्दल समर्थनचा २०१६ चा पुरस्कार प्रदान करण्यांत आला.
हा पुरस्कार प्रमुख पाहुणे भरतकुमार राऊत यांच्या हस्ते व समर्थनचे अध्यक्ष विवेक पंडित तसे प्रमुख अतिथी डॉ़ अशोक येंडे(प्रमुख लॉ़ अ‍ॅकेडमी, मुंबई विद्यापिठ),डॉ़ सुंदर राजदिप (विभाग प्रमुख,संज्ञापन व पत्रकारिता, मुंबई विद्यापिठ), तुळशिदास भोईटे, शैलेष गायकवाड यांच्या उपस्थितीत देण्यांत आला़ महाराष्टÑातील ग्रामीण भागात परिश्रमपूर्वक वृत्तसंकलन करुन मानवी हक्कांच्या प्रश्नांना वाचा फोडणाºया पत्रकारांना पुरस्कार देण्याचे हे समर्थन या संस्थेच २१ वे वर्षे आहे़ आजपर्यत सुमारे १०९ पत्रकारांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे़ हे पुरस्कार मानवी हक्कांसाठी विषेश उल्लेखनीय काम करणाºया पत्रकारांना दिले जातात
जिल्यांतील वाढते कुपोशण, आश्रमशाळांची दुरवस्था, अंगणवाडयांचे प्रश्न, जिल्हा परिषद शाळांचे प्रश्न, व शेतक-यांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने लिखाण केले आहे़
 

Web Title:  Support for Lokmat's Rahul Wadekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.