शिवसेनेचा दुसरा मास्टर स्ट्रोक : वनगा कुटुंबीयांना ‘बेपत्ता’ करून कापले भाजपाचे नाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 06:50 AM2018-05-06T06:50:16+5:302018-05-06T06:50:16+5:30

दिवंगत खासदार वनगा ह्यांच्या मृत्यू नंतर जिल्ह्यातील काही भाजपा पदाधिकाऱ्या कडून होणाºया कुचंबणेमुळे वनगा कुटुंबियांची होणारी घुसमट/अस्वस्थता ओळखून शिवसेनेने त्यांना आपल्यात घेऊन भाजप ला तोंडघशी पाडले. राज्यभर भाजपच्या या नाचक्की चे पडसाद उमटण्याची शक्यता पाहता पालकमंत्र्यासह वरिष्ठ पदाधिका-यांनी वनगांच्या घरी जाऊन त्यांना स्वगृही आणण्याचे केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

 Shiv Sena's second master stroke: BJP's Nose cut off by Vanada family '' | शिवसेनेचा दुसरा मास्टर स्ट्रोक : वनगा कुटुंबीयांना ‘बेपत्ता’ करून कापले भाजपाचे नाक

शिवसेनेचा दुसरा मास्टर स्ट्रोक : वनगा कुटुंबीयांना ‘बेपत्ता’ करून कापले भाजपाचे नाक

Next

- हितेन नाईक
पालघर : दिवंगत खासदार वनगा ह्यांच्या मृत्यू नंतर जिल्ह्यातील काही भाजपा पदाधिकाऱ्या कडून होणाºया कुचंबणेमुळे वनगा कुटुंबियांची होणारी घुसमट/अस्वस्थता ओळखून शिवसेनेने त्यांना आपल्यात घेऊन भाजप ला तोंडघशी पाडले. राज्यभर भाजपच्या या नाचक्की चे पडसाद उमटण्याची शक्यता पाहता पालकमंत्र्यासह वरिष्ठ पदाधिका-यांनी वनगांच्या घरी जाऊन त्यांना स्वगृही आणण्याचे केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. सेनेने गनिमी कावा खेळून भाजप पदाधिकारी पोचण्या आधीच वनगा कुटुंबियांना बेपत्ता करून (आपल्या ताब्यात घेऊन) भाजपचे नाक कापले.
ज्या वनगानी पक्ष्याच्या बळकटी साठी जीव ओतून काम करताना कधीही कुठल्याही पदाची अपेक्षा ठेवली नव्हती. आपल्या आयुष्याची ३५ वर्षे पक्षासाठी खर्ची घातल्या नंतर जो न्याय मुंडे नंतर पंकजा मुंडेंना मिळाला तोच न्याय वनगांच्या मृत्यू नंतर श्रीनिवास ला मिळणे आवश्यक होते.
मात्र पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार तथा जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे, प्रदेश सदस्य बाबजी काठोळे आदी नी वनगा कुटुंबीयांना योग्य सन्मान दिलाच नाही. बाबजी काठोळे नी वनगांची शोक सभा यशस्वी होऊ न देण्याची खेळी खेळली तर आ. धनारे यांनी तलासरी मधील कार्यक्र माला हजेरी लावणाºया श्रीनिवास यांना दुय्यम वागणूक दिली, मुख्यमंत्र्यांनी वनगा कुटुंबियांनी भेटीसाठी मागूनही वेळ न देणे आदी कारणांमुळे वनगा कुटुंबियांच्या मनातल्या खदखदीला वाट करून देण्याची योग्य संधी सेनेने साधली. आणि मातोश्री वर गेलेले वनगा कुटुंबीय शिवबंधनात बांधले गेले.
ज्या वनगांनी आपले पूर्ण आयुष्य पक्ष्याच्या उभारणी साठी खर्ची घालून ४ वेळा खासदार ,एकदा आमदार, जिल्हाध्यक्ष आदी पदे भूषवीत निष्कलंक, निस्वार्थी म्हणून लौकिक मिळविला अशा या व्यक्तीच्या कुटुंबियांची त्यांच्या मृत्यू पश्चात पंतप्रधान, मुख्यमंत्री, अमित शहा सारखे वरिष्ठ प्रतारणा करीत असतील तर आपले काय? असा सवाल भाजप मधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मनाला अस्वस्थ करू लागला आहे. वाढवण प्रश्न, जिंदाल जेट्टी, बुलेट ट्रेन, सूर्याचे पाणी, आदी जिल्हावासीयांना उध्वस्त करणाºया आपल्याच पक्षा च्या प्रकल्पाना विरोध करीत त्यांच्या विरोधात दंड थोपटण्याचे सामर्थ्य चिंतामण वनगानी अनेक वेळा दाखविले होते.
त्याची किंमत त्यांच्या कुटुंबियांन त्यांच्या पश्चात भाजपने मोजायला लावली होती. त्यावर सेनेने वनगा कुटुंबियांना जवळ करून चांगलीच मात केली.

खरे कोण? श्रीनिवास की मुख्यमंत्री

मी वडीलांच्या निधनानंतर पंतप्रधान, पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली परंतु कुणीही उत्तर दिले नाही. आमची कदर शिवसेनेने केली त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत शिवसेना सोडणार नाही असे श्रीनिवास यांनी म्हटले आहे.

तर मुख्यमंत्र्यांनी तुम्ही कधीही येऊन मला भेटू शकता गरज पडली तर शिवसेनेशी युती करू असा मेसेज श्रीनिवास यांना पाठविल्याचे म्हटले आहे. तसेच भाजपचे नुकसान होईल असे मी कधीही काहीही करणार नाही असाही मेसेज श्रीनिवास यांनी आपल्याला पाठविल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

Web Title:  Shiv Sena's second master stroke: BJP's Nose cut off by Vanada family ''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.