दफनभूमीचा प्रश्न आता उच्च न्यायालयात जाणार, सेना उपशहरप्रमुख आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 03:26 AM2017-11-04T03:26:31+5:302017-11-04T03:26:38+5:30

जमीन सीआरझेड बाधित असताना कोणतीही परवानगी न घेतला सर्वधर्मीय दफनभूमीचे काम सुरु करून ११ कोटी रुपयांंची उधळपट्टी करणा-या वसई विरार महापालिकेवर कारवाई व्हावी यासाठी शिवसेनेचे नवघर-माणिकपूर उपशहरप्रमुख सुनील मुळ््ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.

The question of the graveyard will now go to the High Court, Army Deputy Chief Offensive Aggressive | दफनभूमीचा प्रश्न आता उच्च न्यायालयात जाणार, सेना उपशहरप्रमुख आक्रमक

दफनभूमीचा प्रश्न आता उच्च न्यायालयात जाणार, सेना उपशहरप्रमुख आक्रमक

googlenewsNext

वसई : जमीन सीआरझेड बाधित असताना कोणतीही परवानगी न घेतला सर्वधर्मीय दफनभूमीचे काम सुरु करून ११ कोटी रुपयांंची उधळपट्टी करणा-या वसई विरार महापालिकेवर कारवाई व्हावी यासाठी शिवसेनेचे नवघर-माणिकपूर उपशहरप्रमुख सुनील मुळ््ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
वसई विरार महापालिकेने सीरआरझेड बाधित सनसिटी येथील भूखंडावर सर्वधर्मीय दफनभूमीचे काम सुरु केले होते. हरित पट्टा, पाणथळ, ना विकास क्षेत्रात ही जागा मोडत आहे. या कामाला सीआरझेडची परवानगीही घेण्यात आली नव्हती. मुळ््ये यांनी सदर प्रकरण पुणे येथील हरित लवादाकडे नेले होते.
मागच्या आठवड्यात राष्ट्रीय हरित लवादाने येथील दफनभूमीच्या भिंतीसह अन्य बांधकाम काढून टाकण्याचे आदेश दिले होते. तसेच याठिकाणचा भरावही काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. या संपूर्ण कामासाठी खर्च झालेल्या तब्बल अकरा कोटी रुपयांची वसुली कुणाकडून करायची. हे दायित्व कुणाचे आदी प्रश्न निर्माण झाले आहेत, अशी माहिती मुळ््ये यांनी दिली. सध्या हे प्रकरण शहरात चर्चेचा विषय बनले आहे.

हकेखोरपणे दफनभूमीचे काम पुढे रेटले
दफनभूमीचे काम सुरु केल्यानंतर अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही प्रशासनाने हकेखोरपणे दफनभूमीचे काम पुढे रेटले होते. या कामासाठी तब्बल अकरा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. म्हणूनच सदर प्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई व्हावी यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे मुळ््ये यांनी सांगितले.

Web Title: The question of the graveyard will now go to the High Court, Army Deputy Chief Offensive Aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.