नालासोपा-यात एकाच कुटुंबातील 8 जणांची विष पिऊन आत्महत्या, बापलेकीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 12:46 IST2017-09-18T12:45:26+5:302017-09-18T12:46:18+5:30

नालासोपार येथे एकाच कुटुंबातील आठ जणांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये बापलेकीसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आई आणि दुसरी मुलगी बचावल्या आहेत.

Nalasopara family eats poison to end life | नालासोपा-यात एकाच कुटुंबातील 8 जणांची विष पिऊन आत्महत्या, बापलेकीचा मृत्यू

नालासोपा-यात एकाच कुटुंबातील 8 जणांची विष पिऊन आत्महत्या, बापलेकीचा मृत्यू

वसई, दि. 18 -  नालासोपार येथे एकाच कुटुंबातील आठ जणांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये बापलेकीसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आई आणि दुसरी मुलगी बचावल्या आहेत. नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगरमध्ये 30 वर्षीय मनिष सिंग कुटुंबासह राहतो. मनिषवर बँकेचं कर्ज असल्यामुळे त्यानं नैराश्यातून आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रविवारी रात्री मनिषसह संपूर्ण कुटुंबाने विष पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मनिषसह तीन जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये सात वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.  दरम्यान, मायलेकींना वसई-विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. या दोघींची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री या कुटुंबाने विषप्राशन केलं होतं. सकाळी नातेवाईकांमुळे ही घटना उघडकीस आली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Web Title: Nalasopara family eats poison to end life