जुचंद्र अंगणवाडीला दिल्लीतील शिष्टमंडळाची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 02:48 AM2018-12-27T02:48:05+5:302018-12-27T02:48:31+5:30

पालघर जिल्ह्याअंतर्गत वसई तालुक्यातील, नायगाव (पुर्व) जुचंद्र अंगणवाडीस सोमवारी ग्राममंगल संस्था शिष्टमंडळ, दिल्ली यांनी सदिच्छ भेट दिली.

 A meeting of delegation of Delhi's Jungendra Anganwadi | जुचंद्र अंगणवाडीला दिल्लीतील शिष्टमंडळाची भेट

जुचंद्र अंगणवाडीला दिल्लीतील शिष्टमंडळाची भेट

Next

पारोळ : पालघर जिल्ह्याअंतर्गत वसई तालुक्यातील, नायगाव (पुर्व) जुचंद्र अंगणवाडीस सोमवारी ग्राममंगल संस्था शिष्टमंडळ, दिल्ली यांनी सदिच्छ भेट दिली. या शिष्टमंडळामध्ये प्रख्यात अणुशास्त्रज्ञ पद्मविभुषण डॉ. अनिल काकोडकर यांचा प्रामुख्याने सहभाग होता.
यासोबतच ग्राममंगल संस्था अध्यक्ष डॉ. हेमचंद्र प्रधान, शिक्षणतज्ञ रमेश पानसे, बालविकास अधिकारी मनीषा साळुंखे, सुपरवायझर योगिता डांगे, ग्राममंगल संचालक प्रवीण गुरव, ग्राममंगल सहयोगी निकिता काटले, जुचंद्र अंगणवाडी सेविका इंदुमती पाटील, वैशाली म्हात्रे, निर्मळा भोईर व छाया म्हात्रे आदींची उपस्थती
होती.
गेल्या अडीच वर्षांपासून ग्राममंगल संस्थेच्या माध्यमातून स्नेह प्रकल्प अंतर्गत पालघर जिल्ह्यातील अंगणवाडयांमध्ये बालशिक्षणाचे काम सुरू असून ग्रामीण व खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना भेदभाव न करता शिक्षणाची समसमान संधी मिळावी, हा मुख्य उद्देश आहे.
शिष्टमंडळाने जुचंद्र अंगणवाड्यांची सविस्तर पाहणी केली असता अंगणवाडी इमारत परिसर, अंतर्गत सजावट व विद्यार्थी खूप आवडले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारले असता त्यांच्या अचूक तथा हजरजबाबी उत्तरांमुळे त्यांनी विद्यार्थी व अंगणवाडी सेविकांचे भरभरून कौतुक केले. भारतातील प्रख्यात अणूशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांनी अंगणवाडीना भेट देत बालशिक्षणाचे काम समजून घेतले. शिष्टमंडळाने इतर अनेक अंगणवाडीना भेट देत तेथील कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली. अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी प्रशिक्षण देणे, साधन साहित्य देणे, भेटी देऊन मदत करणे यासारखी कामे सुरू आहेत. आज बालशिक्षणाला घेऊन अंगणवाडी ताई, लहान मुले यांच्यात खूप बदल झाला असून आता अंगणवाडीत मुलं शिकती होत असल्याने अंगणवाडीत होणारे बालशिक्षण आणि इतर राबविण्यात येणारे उपक्र म बघण्यासाठी पद्मविभुषण डॉ. अनिल काकोडकर यांनी सदिच्छ भेट दिली.
डॉ. अनिल काकोडकर यांना जुचंद्रच्या रांगोळी कलेच्या ख्यातीबद्दल समजताच त्यांनी जुचंद्रच्या रांगोळीचे भरभरून कौतुक केले व जुचंद्रच्या रांगोळीकारांमार्फत स्वत:ची रांगोळी साकारण्याची इच्छा व्यक्त केली. माझी रांगोळी काढल्यानंतर मी स्वत: त्या रांगोळीचा फोटो फेसबुकवर शेअर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title:  A meeting of delegation of Delhi's Jungendra Anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.