मोखाड्याची आरोग्यसेवाच ‘सलाइनवर’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 02:47 AM2018-11-08T02:47:20+5:302018-11-08T02:47:37+5:30

मोखाडा तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांची गेल्या चार पाच महिन्यांपूर्वी बदली झाल्याने तालुका आरोग्य अधिकारी पद हे रिक्त झाले असून डॉ. बिरारी हे प्रभारी म्हणून पदभार बघत आहेत.

Malkhal's health service says 'saline' | मोखाड्याची आरोग्यसेवाच ‘सलाइनवर’

मोखाड्याची आरोग्यसेवाच ‘सलाइनवर’

Next

- रविंद्र साळवे
मोखाडा : मोखाडा तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांची गेल्या चार पाच महिन्यांपूर्वी बदली झाल्याने तालुका आरोग्य अधिकारी पद हे रिक्त झाले असून डॉ. बिरारी हे प्रभारी म्हणून पदभार बघत आहेत
तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अनेक पदे रिक्त आहेत यामुळे तालुक्याची आरोग्य सेवाच सलाईनवर आहे यामुळे येथील रुग्णांना स्थानिक ठिकाणी उपचारच मिळत नाहीत. पदरमोड करु न येथील आदिवासींना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे. तालुक्यातील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. मोखाडा तालुक्यात खोडाळा, वाशाळा, आसे, मोर्हांड अशी चार प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. यामध्ये आसे व वाशाळा येथील प्रथमश्रेणीचे वैद्यकीय अधिकारी पद रिक्तच आहे
व त्याचबरोबर मोरहंडा व खोडाळा येथील द्वितीय श्रेणीचे वैद्यकीय अधिकारी पदेही रिक्त आहेत दुर्गम भागात पोहचण्यासाठी आरोग्य पथके आहेत, परंतु सूर्यमाळ पथकाला वैद्यकीय अधिकारीच नाही. त्यातच नेहमी होणाºया मिटींग्ज यामुळे वैद्यकीय अधिकाºयाचा ठिकाणच नसतो, तसेच या रिक्त पदांमुळे सर्वच आरोग्य केंदे्र पोरकी होत आहेत व उपलब्ध सुविधांच्या अभावामुळे येथील रु ग्णांचे उपचाराविना हाल होत आहेत तालुक्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर असताना याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

स्थायी समितीच्या मीटिंग मध्ये वारंवार रिक्त पदाचा प्रश्न मांडला आहे नेहमीच या बाबत पत्रव्यवहार करत आहो त परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे
- प्रकाश निकम, जिल्हा परिषद सदस्य (पालघर)

चार प्राथमिक आरोग्य केंद्रात मंजूर 124
पदांपैकी तालुका आरोग्य अधिकाºयांसह विविध ३४ पदे रिक्त आहेत.

खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र
वैदकीय अधिकारी गट (ब) आडोशी
आरोग्य सहाय्यक २ (कारेगाव सूर्यमाळ) वाहनचालक ;कारेगाव सूर्यमाळ शिपाई
खोडाळा सूर्यमाळ
पथक -१

आसे प्राथमिक आरोग्य केंद्र:
वैद्यकीय अधिकारी गट (अ) औषधे निर्माण अधिकार - १ वाहन चालक, शिपाई -२
सफाई कामगार -१ कनिष्ठ सहायक- १

वाशाळा प्राथमिक आरोग्य केंद्र :
वैद्यकीय अधिकारी (अ) औषधे निर्माण अधिकारी -१ वाहनचालक -१
शिपाई- ३ सफाई कामगार -१

मोरहंडा प्राथमिक आरोग्य केंद्र : वैद्यकीय अधिकारी गट (ब) वाहनचालक -१ शिपाई- २ आरोग्य सहायक- १

Web Title: Malkhal's health service says 'saline'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.