लग्नासाठी ग्रामस्थच उभारतात लाखोंची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 02:20 AM2019-04-12T02:20:14+5:302019-04-12T02:20:19+5:30

कोचाईचा समाजात आदर्श ठरावा असा पायंडा : लग्नघर कर्जबाजारी होऊ नये म्हणून आर्थिक मदत

Lakhs help build villas for marriage | लग्नासाठी ग्रामस्थच उभारतात लाखोंची मदत

लग्नासाठी ग्रामस्थच उभारतात लाखोंची मदत

Next

सुरेश काटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तलासरी : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू झालेत आणि लग्न म्हटलं की खर्च हा आलाच. आदिवासी भागामध्ये कार्यामध्ये मानपान, लग्न मंडप, वाजंत्री, डीजे, खानपान इत्यादीसाठी लाखो रु पये खर्च करावा लागतो. बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये लोकलाजेस्तव कर्ज काढावे लागते. लग्नात होणारा अमाप खर्च एखाद्या कुटुंबावर कर्जाचा डोंगर होऊ नये यासाठी तालुक्यातील कोचाई गावातील ग्रामस्थांनी समाजात आदर्श ठरावा असा पायंडा पाडला आहे.


गावातील नोकरी, व्यवसाय, शेती व रोजगार हमीवर असणारे १०० ते १५० ग्रामस्थांनी एकत्र येऊन लग्नकार्य असलेल्या कुटुंबासाठी आर्थिक मदतरूपाने पैसे उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीत बसणारे प्रत्येक ग्रामस्थ स्वत:च्या ऐपतीप्रमाणे १००० ते ५ हजार रु पये पर्यंत जमा करून रक्कम लग्न कुटुंबातील प्रमुख व्यक्तीकडे देतात. एकत्र जमा केलेली रक्कम साधारण एक दीड लाखाच्या घरात गोळा होत असल्याने लग्न घराला मोठा हातभार लागत आहे.


तालुक्यातील आदिवासी समाजामध्ये लग्नात मांसाहारी जेवणाबरोबरच पाहुण्या मंडळींसाठी ताडीला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे लग्नात सरासपणे ताडी, कोल्ड्रिंक्स बरोबरच मद्यपान करण्यात येतो. या बांधीलकीमुळे खर्चाचा भार काहीसा कमी होऊन सामाजिक बांधिलकी ही जपली जात असल्याने एकमेकांविषयी आदर निर्माण होऊ लागला आहे.


बारा वर्षांपासून जपलेली बांधीलकी
कोचाई गावातील हा अभिनव उपक्र म ग्रामस्थ दहा ते बारा वर्षांंपासून राबवत आहेत. ह्याच अभिनव उपक्र मातून आर्थिकमदतीचा हातभार लागेल्या गावातील महेश अंधेर व संदीप अंधेर या दोन भावंडांचा ६ एप्रिल रोजी आदिवासी परंपरेनुसार थाटामाटात लग्न पार पडले. बैठकीतील ग्रामस्थ लग्न व्यवस्थित पार पडे पर्यंत नियोजनात ही सहभागी होऊन एकमेकांमधील बांधिलकी जपत असतात.
आदिवासी समाजात लग्न जुळल्यानंतर वधूला (देज) दिला जातो. यामध्ये तांदूळ, कडधान्य आणि वधूपक्षाला देण्यात येणारी ठरलेली ठराविक रक्कम असते. त्याच बरोबर वधूला लग्नासाठी नववधू शुंगार व कपडेही दिले जातात.

Web Title: Lakhs help build villas for marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.