कातकरी वस्त्या पुन्हा रोजगाराच्या शोधात; रोजगार हमी योजना फक्त कागदावरच, स्थलांतरामुळे वाढते कुपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:48 AM2017-11-05T00:48:14+5:302017-11-05T00:48:26+5:30

मेहनत करण्याची तयारी आहे पण हाताला काम नाही, रोजगारा पायी इथली गावेच्या गावे रिकामी होत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटली तरी येथील रोजगाराची समस्या जशीच्या तशी असल्याने त्यांच्या आयुष्यात ख-या अर्थाने स्वातंत्र्याची पहाट उगवलीच नाही.

Katkari settlements resume employment search; Employment Guarantee Scheme Only on Paper, Increasing Malnutrition due to Migratory | कातकरी वस्त्या पुन्हा रोजगाराच्या शोधात; रोजगार हमी योजना फक्त कागदावरच, स्थलांतरामुळे वाढते कुपोषण

कातकरी वस्त्या पुन्हा रोजगाराच्या शोधात; रोजगार हमी योजना फक्त कागदावरच, स्थलांतरामुळे वाढते कुपोषण

Next

मोखाडा : मेहनत करण्याची तयारी आहे पण हाताला काम नाही, रोजगारा पायी इथली गावेच्या गावे रिकामी होत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटली तरी येथील रोजगाराची समस्या जशीच्या तशी असल्याने त्यांच्या आयुष्यात खºया अर्थाने स्वातंत्र्याची पहाट उगवलीच नाही. या परिस्थितीमुळे इतर समाजापेक्षा वेगळी जीवनशैली जगणाºया हा कातकरी समाज खºया अर्थाने आजही स्थलांतरीत जीवन जगत आहे.
या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न झाले, विविध योजना सुरु झाल्या खºया परंतु त्यांची अमलबजावणी नेमकी कुठे झाली हा संशोधनाचा विषय आहे. आजही हजारो कातकरी बांधव रोजगारासाठी दिवाळी संपताच तालुक्या बाहेर, जिल्हाबाहेर वीटभट्टी, बांधकाम व्यावसायिक व मजुरीसाठी स्थलांतरित झाले असल्याचे वास्तव आहे. मूळ निवासी असणाºया या समाजाची मालकीची जमीन नाही. स्थलांतरीत जीवनशैलीमुळे शिक्षणात पडणारा खंड, वाढती व्यसनाधीनता, वाढते कुपोषण, बालविवाह आदी समस्यांचा डोंगर अशी स्थिती असल्याची माहिती हिरवे येथील अशोक पवार यांनी लोकमतला सांगितले.
स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने हा समाज दरवर्षी स्थलांरीत गावात स्वत:च्या मालकीची शेतजमीन नसल्याने शिवाय उदरिनर्वाहचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने जव्हार, मोखाडा, विक्र मगड येथील कातकरी बांधवाना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. रोजगार हमीची कामे कायम स्वरूपी नसल्यामुळे हा समाज या रोजगार हमी योजने पासून दूरच आहे.

शिक्षणाची भट्टी
पेटलीच नाही
कायम स्थलांतरीत असणाºया या समाजातील मुलेही शिक्षणापासून कायम वंचित राहिले आहेत जूनमध्ये गावातील शाळेत जाणारी मुले दिवाळीनंतर आई वडिलांसोबत वीटभट्टीवर जातात त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची नेहमीच परवड होत असते. यामुळे शासनाने स्थलांतरित मुलांसाठी हंगामी वस्तीशाळा सुरु केल्या होत्या मात्र, या शाळांमध्ये गैरव्यवहार झाल्याने ह्या शाळा देखील अल्पायुषी ठरल्या. त्यामुळे कातकºयांची ही मुल शिक्षणापासून वंचित राहिली.

ढोर मेहनत अन तुटपुंजी कमाई
वीटभटीवर कामासाठी भल्या पहाटेच उठावे लागते. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात कडाक्याची थंडी असतानाही अंगावर काम घेतल्याने चिखल करणे, विटा थापने, भट्टी रचणे आदि कामे दिवसभर उभे राहूनच करावी लागतात.
याबदल्यात वीटभट्टी मालकांकडून आधीच उचल घेतल्यामुळे आठवड्याला घरातील साहित्य घेण्या पुरते पैसे मिळतात. व्यसनाधीनतेची जोड असल्याने ढोर मेहनत अन् कमाई तुटपुजी अशी स्थिती आहे.

गेल्या शतकानू शतके आमचा कातकरी समाज हा वंचित व उपेक्षित राहिला आहे. दिवाळीचा सन संपताच येथील कातकरी बांधव रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाला आहे .- अशोक पवार, हिरवे गाव

Web Title: Katkari settlements resume employment search; Employment Guarantee Scheme Only on Paper, Increasing Malnutrition due to Migratory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.