जनता काँग्रेसलाच निवडून देणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 03:54 AM2018-05-25T03:54:35+5:302018-05-25T03:54:35+5:30

सेना-भाजपावर टीका : प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन

Janata Congress will be elected! | जनता काँग्रेसलाच निवडून देणार !

जनता काँग्रेसलाच निवडून देणार !

Next

डहाणू : भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवेंनी जिवंतपणी कधी वनगांकडे पाहीले सुद्धा नाही. ते आता वनगांसाठी मते मागत आहेत. दानवेंना सवरा आणी वनगा यांच्यामध्ये फरक ओळखता येत नाही .जिवंत असताना कोणाला आठवण झाली नाही. पण त्यांच्या निधनानंतर मात्र सर्वच दावेदार बनत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरूवारी येथे केली .
काँग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा आदिवासींचे नेतृत्व करणारे आहेत. शिंगडा हे प्रशासनात राजकारणात शांतपणे काम करणारे अनुभवी नेते आहेत. शिंगडांना निवडुन देण्यासाठी साथ देण्याचे अवाहन अशोक चव्हाण यांनी केले. काÞँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण वाणगाव येथे काँग्रेसचे उमेदवार दामु शिंगडा यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
पालघर जिल्हा निर्मीतीसाठी काँग्रेस -राष्ट्रवादी सरकारचे योगदान आहे. तर या सरकारला ४ वर्षाच्या काळात अद्याप ३२ खात्याची कार्यालये उभारता आले नाहीत. ते विकास काय करणार?विनाशकारी प्रकल्प राबवुन जमीनी काढून घेण्याचे काम भाजप शिवसेना सरकारने सुरु केले आहे. हे प्रकल्प आणत असताना कोणी तुम्हाला तुमचे मत विचारले आहे का? असा सवाल त्यांनी केला. या भागात चालणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेच्या निधीची तरतूद कमी केली, शिष्यवृत्ती कमी केली स्कॉलरशिप मिळत नाही अशी परिस्थिती असतांना बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग कशासाठी पाहीजेत. अशी उपरोधीक टीका अशोक चव्हाण यांनी केली. या देशाला भाजपमुक्त करण्यासाठी देशातील प्रमुख पक्ष एकत्र आणण्याची गरज आहे .सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे या सरकारचे काम सुरु आहे. भाजप सत्तेत असताना सर्व खात्यांचा वापर भाजपला ताकद देण्यासाठी करीत असल्याची टीका त्यांनी केली .तर काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच प्रश्न सोडवणारा आहे.असेही ते म्हणाले. या सरकारने अघोषित आणीबाणी घोषित केली आहे. भाजप सरकार उखडून फेकून टाका, असे आवाहन त्यांनी मतदारांना केलं.

ठाकूर यांचे टीकास्त्र
भाजप सरकारला आदिवासींसाठी वेळ नाही आणि आता राज्याचे मुख्यमंत्री मते मागण्यासाठी चारचार वेळा तालुक्यात येतात. अशी टीका आमदार आनंद ठाकूर यांनी केली.पालकमंत्री मूग गिळून बसतात .निर्णय घेत नाही.त्यामुळे आदिवासींचा विकास रखडला आहे असेही ते म्हणाले.
 

Web Title: Janata Congress will be elected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.