मेस्मा प्रकरणी गोऱ्हेंची आगपाखड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 02:56 AM2018-05-26T02:56:11+5:302018-05-26T02:56:11+5:30

मतदारांनी शिवसेनेला आधार द्यावा : पोटनिवडणूकीत वनगा परिवाराचे आवाहन

Gorjhani Magpha | मेस्मा प्रकरणी गोऱ्हेंची आगपाखड

मेस्मा प्रकरणी गोऱ्हेंची आगपाखड

Next

पालघर : भाजपा सरकारची संवेदनशीलता मृत्युपंथाला लागली आहे. त्यामुळेच भूमीपुत्रांच्या अधिकारांवर सरकार हल्ला करत आहे. अशा परिस्थितीत शिवसेना भूमीपुत्रांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचे सूतोवाच शिवसेना उपनेत्या तथा प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोºहे यांनी पालघर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्री वनगा, उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा, वर्षा वनगा तसेच डहाणू महिला तालुकासंघटक सुलभा गडग उपस्थित होत्या.
अंगणवाडी सेविका या विकासाच्या पाया आहे. परंतु या सेविकांना वेळेवर पगार नाही, कमी पगार हे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार असंघिटत कामगारांना मेस्मा लावण्याची तयारी केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेनी अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मेस्मा कायदा रद्द करण्यासाठी सरकारला भाग पाडले असे ही आ. गोºहे म्हणाल्या.
जिल्ह्यातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगून आदिवासी विकास विभागाच्या योजनाची अंमलबजावणी नीट होत नसल्याने मी आदिवासी विकास विभागाचे मंत्री विष्णू सवरा यांना अनेक वेळा फोन केला होता. यापूर्वी बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित हे सर्व वाल्याचे वाल्मिकी झाल्याचा आरोप ही त्यांनी केला.
आ. गोºहे यांनी पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेन व महामार्ग सारखे स्थानिकांना उध्वस्त करणारे प्रकल्प आणले जात असतील आणि अशा प्रकल्पांना स्थनिकांचा विरोध आहे म्हणून शिवसेना सदैव स्थानिकांच्या पाठीशी उभी राहणार आहे. पालघर जिल्ह्यात मराठी जनता मोठ्या प्रमाणात राहते. त्यामुळे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जिल्ह्यात प्रचारासाठी आले तरी त्यांना कोणी ओळखत नाही. जिल्ह्यात मराठी माणसांवर भाजपचा विश्वास नाही. योगी तसेच तिवारी सारखे नेते पालघरमध्ये अमराठी लोकांची मते खेचण्याकरीता आणले जात आहेत असे त्या म्हणाल्या.
भाजपने स्वर्गीय चिंतामण वनगा यांच्या कुटुंबियातील वारसांना उमेदवारी जाहीर केली असती तर शिवसेनेने कधीच दुसरा उमेदवार दिला नसता कारण यापूर्वी शिवसेनेने कायम भावना व प्रघात जपले आहेत. याची अनेक उदाहरणे आ. गोºहे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

आम्हाला तिकीट नको होते, आम्हाला गरज होती सांत्वनाची
ज्यांनी आपल्या आयुष्याची ३५ वर्ष घालविली असे माझे सासरे दिवंगत चिंतामण वनगा याच्या निधना नंतर ३ महिने भाजपचा एकही मोठी व्यक्ती आम्हाला भेटायला आले नाहीत. अशी तक्रार त्यांची सून वर्षा वनगा यांनी केली. आम्हाला तिकीट नको आम्हाला गरज होती धीर आणि सांत्वनाची, मात्र असे काही घडलेच नाही असे म्हणून त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शिवसेनेच्या नेत्यांनी कोणतीही अट न ठेवता मातोश्रीवर नेले व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घरातील व्यक्ती प्रमाणे वागणूक देऊन आधार दिला असे ही ते म्हणाले.

Web Title: Gorjhani Magpha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.