आदिवासींची मान्सूनपूर्व खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:45 PM2018-05-30T23:45:52+5:302018-05-30T23:45:52+5:30

पावसाळा पूर्व खरेदी हा पालघर व ठाणे जिल्ह्यातील ग्रामिण भागातील दरवर्षीचा परिपाठ असून त्यासाठी विविध आठवडा बाजारामध्ये मोठी गर्दी दिसत आहे

The crowd for the pre-monsoon purchase of the tribals | आदिवासींची मान्सूनपूर्व खरेदीसाठी गर्दी

आदिवासींची मान्सूनपूर्व खरेदीसाठी गर्दी

Next

विक्रमगड : पावसाळा पूर्व खरेदी हा पालघर व ठाणे जिल्ह्यातील ग्रामिण भागातील दरवर्षीचा परिपाठ असून त्यासाठी विविध आठवडा बाजारामध्ये मोठी गर्दी दिसत आहे. एकदा का पाऊस सुरु झाला की येथील शेतकरी शेतीच्या कामांना सुरुवात करतो. त्याला या काळात वेळ नसतो. त्यामुळे ग्रामिण भागामध्ये या आघोटच्या खरेदीला मोठे महत्व असते.
मसाला, मिरची, हळद, कांदा, बटाटा, कडधान्ये अशा गरजेच्या वस्तूंबरोबर सुकी मच्छीही तीन ते चार महिने पुरेल इतका साठा करुन ठेवण्यात येतो. पावसाळयाच्या हंगामाला शेतकरी अगोट म्हणून संबोधत असतात़ पाऊस केरळमध्ये दाखल झाल्याची वार्ता बुधवारी धडकल्याने खरेदी विक्रीची ही घाई जाणवू लागली आहे. या खरेदी-विक्रीलाही महागाईची झळ असली तरी विक्रमगड, वाडा व जव्हार येथील ग्राहकांना ही खरेदी आवश्यक असते. हा डोंगरी व दऱ्या खोºयांचा भाग असल्याने बºयाचदा पावसाळ्यात संपर्क तुटतो.अशावेळी माचिस सारखी जिणस सुद्धा महत्वाची ठरते.
सक्की मासळी ही येथील आदिवासी व इतर समाजाच्या अन्नातील महत्वाचा घटक असल्याने सातपाटी, मुंबई, वसई, केळवे, डहाणू आदीविण भागातुन मासळी विक्रेत्या महिला विक्रमगड, व परिसरातील दादडे, तलवाडा, साखरे, आलोंडा, मलवाडा आदी विविध खेडया पाडयात गावात आठवडी बाजारात येऊन आपले दुकानें थाटले आहे. यामध्ये बोंबील, कोलीम, आंबडकाड, बांगडे, सुरमई, बगीसुकट, मांदीला, सुकट, खारे अशा विविध प्रकारच्या मासळीचा समावेश असतो. दिवसभर पावसात भिजुन आलेल्या गडयांला बांगडा भाजुन दिला की, त्याच्या चेहºयावरचे समाधान पाहण्या जोगे असते़
शिवाय कांद्यात तळलेल्या कोलीमबरोबर शेताच्या बांधावर बसुन केलेल्या न्याहारीची चव काही वेगळीच असते.

सुक्या मावºयाचे भाव दुपटीने वाढले
उन्हाळयात विकली न गेलेली मासळी कोळी सुकवतात तेसच मे महिन्यात सुकवलेली सुकी मासळी ते विक्रीसाठी घेऊन येतात. ़विक्रमगडच्या नाक्यावर परिसरात तसेच आसपासच्या खेडयावरील परिसरात साखरा, दादडे, तलवाडा, आलोंडा, मलवाडा, जव्हार परिसरात अशीच सुकी मासळी सध्या मोठया प्रमाणात विक्रीसाठी येत आहे़ पालघर, वसई, सातपाटी, केळवे, डहाणु येथून सुकी मासळी घेऊन आलेल्या महिला बाजारात सुकी मच्छी विकत आहेत.़ तसेच स्थानिक कोळी महिलाही गावात पाडयात सुकी मच्छी विकतांना दिसत आहेत़
गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या महागाईचा फटका सुक्या मासळीलाही (मावरा) बसला आहे़ बोंबील किलोमागे शंभर रुपये माहगलेले आहेत़ तर बागडा, आंबडकाड, मांदेली, लोलीम, बगी, सुकट यांचेही भाव दुपटीने वाढलेले दिसत आहेत़ सुक्या मासळीचे भाव गतवर्षीपेक्षा यावर्षी वाढलेले असले तरी पावसाळयात सुकी मासळीही ग्रामीण भागातील शेतकºयांची मुखत्वे येथील खेडया-पाड्यातील आदिवासींची गरज आहे़

Web Title: The crowd for the pre-monsoon purchase of the tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.