विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे, संचालकासह २ शिक्षकांवर गुन्हे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 06:21 AM2018-01-29T06:21:23+5:302018-01-29T06:21:38+5:30

जुन्नर तालुक्यातील येनेरे इंडियन इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थिनींना बाथरूममध्ये बोलावून शिक्षकांनी त्यांच्यासोबत अश्लिल चाळे करण्याचा संतापजनक प्रकार घडला असून संस्थापक सचिन घोगरे सह दोन शिक्षकांवर जुन्नर येथे पालकांनी गुन्हे दाखल केले आहेत.

 Crime against Students, Crime against 2 teachers with Director | विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे, संचालकासह २ शिक्षकांवर गुन्हे  

विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे, संचालकासह २ शिक्षकांवर गुन्हे  

Next

जव्हार : जुन्नर तालुक्यातील येनेरे इंडियन इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थिनींना बाथरूममध्ये बोलावून शिक्षकांनी त्यांच्यासोबत अश्लिल चाळे करण्याचा संतापजनक प्रकार घडला असून संस्थापक सचिन घोगरे सह दोन शिक्षकांवर जुन्नर येथे पालकांनी गुन्हे दाखल केले आहेत.
आदिवासी विकास विभागा अंतर्गत जव्हार प्रकल्पातील २५० विद्यार्थी जुन्नर तालुक्यातील येनेरे इंडियन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकत आहेत. त्यापैकी काही विद्यार्थिनींना बाथरूममध्ये बोलावून त्यांच्याशी छेडछाड करून अश्लिल चाळे करण्याचे घृणास्पद कृत्य संचालकासह शिक्षकांनी केले आहे. त्यामुळे आदिवासी अस्मिता संघटनेने पुढाकार घेऊन या विद्यार्थिनींना न्याय मिळवून देण्यासाठी त्या संचालकासह दोन शिक्षकांवर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून आरोपीना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे जव्हार प्रकल्पातील विद्यार्थी पालकांमध्येही घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी मुलांसाठी मोफत खाजगी र्इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांची निवड करून आदिवासी विकास विभागाकडून निवड केलेल्या नामांकित इंग्रजी शाळांत ही मुले शिक्षणासाठी पाठवली जात आहेत. या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी आदिवासी विकास प्रकल्पातून भरली जाते मात्र जुन्नर तालुक्यातील येनेरे इंडियन इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थिनींवर झालेला प्रकार घृणास्पद आहे. त्यामुळे जव्हार तालुक्यातील पालकांचीही काळजी वाढली आहे. ज्या पालकांची मुले येनेरे इंडियन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. त्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आदिवासी विकास प्रकल्पातील महीनाभरापूर्वी पाचगणी येथील इंग्लिश मिडीयम शाळांत डहाणू प्रकल्पामधील एका विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ माजली होती. तसेच पांचगणी मधील शाळेत मागील काही वर्षापासून वारंवार तक्र ारी येत आहे. तरी या शाळेत विद्यार्र्थी प्रकल्प कार्यालय का पाठवते? असा प्रश्न पडला आहे, असे प्रकार आदिवासी विकास प्रकल्पाने निवडलेल्या इंग्लिश माध्यमाच्या शाळांतच का घडतात? तरीही
त्याच शाळांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा हट्ट प्रकल्प कार्यालय का धरते? त्यामुळे आदिवासी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आदिवासी बांधव आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

तातडीने चौकशी व्हावी

प्रकल्प अधिकाºयांनी तातडीने या सर्व शाळांची तपासणी करून योग्य ती करवाई करावी व शासना कडून केला जाणारा लाखो रुपयांच खर्च वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच पाचगणी शाळेतील गैरप्रकार अनेकदा चव्हाट्यावर आले असतांना पुन्हा त्याच शाळेत प्रवेश कशासाठी घेण्यात आले. याचा तपास प्रकल्प अधिकारी यानी करावा, अशी मागणी आहे

Web Title:  Crime against Students, Crime against 2 teachers with Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.