कोसबाडचे विभाजन मंजूरीच्या प्रतिक्षेत,१९९५ पासून निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:19 PM2019-05-03T23:19:07+5:302019-05-03T23:19:35+5:30

तालुक्यातील २९ पाडे असलेल्या कैनाड ग्रामपंचायतीचे विभाजन करुन कोसबाड या स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेसाठी ग्रामस्थांनी २९ एप्रिल रोजी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

The boycott of the elections since 1995, awaiting the clearance of Kosbad division | कोसबाडचे विभाजन मंजूरीच्या प्रतिक्षेत,१९९५ पासून निवडणुकीवर बहिष्कार

कोसबाडचे विभाजन मंजूरीच्या प्रतिक्षेत,१९९५ पासून निवडणुकीवर बहिष्कार

Next

शौकत शेख 

डहाणू : तालुक्यातील २९ पाडे असलेल्या कैनाड ग्रामपंचायतीचे विभाजन करुन कोसबाड या स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेसाठी ग्रामस्थांनी २९ एप्रिल रोजी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. सातत्याने पाठपुरावा करुन तसेच १९९५ पासून निवडणुकांवर बहिष्कार टाकून सुद्धा सरकारचे दुर्लक्ष आहे.

२०१९ मध्ये या मागणीस पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेने मान्यता देऊन सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, त्याची कोणतीही दाद शासन दरबारी घेतली जात नाही. मात्र चंदा घोरखाना या २५ वर्षाच्या महिलेने मतदान करु न बहिष्कार मोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. डहाणू तालुक्यातील कैनाड ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या १०,१८५ इतकी असून ग्रामपंचायतीमध्ये दोन महसूल गावे समाविष्ट आहेत. त्यापैकी कैनाड गावची लोकसंख्या ५,७०६ व कोसबाड गावची लोकसंख्या ४,४७९ आहे. दोन्ही गावातील अंतर सुमारे सात ते आठ किमी आहे. त्यामुळे कोसबाड गावातील ग्रामस्थांना कैनाड ग्रामपंचायतीमध्ये कामा निमित्त डोंगरावरून पायपीट करत किंवा सात ते आठ किमी डोंगराला वळसा घालून यावे लागते.

१९५२ साली ग्रामपंचायत अस्तित्वात आली तर ग्रामपंचायतीची मुदत १८ जुलै २०२१ पर्यंत आहे. त्या अनुषंगाने कैनाड ग्रामपंचायतीचे विभाजन करून कोसबाड ही नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी यासाठी सभागृहात ठराव घेण्यात आला आहे. २००९ साली दीपक रु पजी ढाक हे सरपंच असतानाआमच्याकडून २००९ ला अधिकृत फाईल पाठवण्यात आली त्यात वेळोवेळी तांत्रिक दुरुस्त्या देण्यात आल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांनी डहाणू तालुक्यातील कैनाड ग्रामपंचायतीचे विभाजन करून कोसबाड स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्यात यावी याबाबत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद पालघर विभागात प्रस्ताव सादर केलेला आहे. दोन्ही गावतील अंतर व दुर्गमता पाहुन त्यावर निर्णय होण्याची मागणी होत आहे.

ग्रामसभेचा ग्रामपंचायत विभाजनाचा ठराव घेऊन सुद्धा नाकारण्यात आली. शेवटी २०१५ साली विशेष ग्रामसभेचा ठराव घेतला. आणि त्या सभेला तत्कालीन तहसीलदार, बीडीवो उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतीत ग्रामस्थांनी जाहीर केले की, जो पर्यंत आमची ग्रामपंचायत स्वतंत्र होत नाही तो पर्यंत आगामी प्रत्येक निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. -उमेश ढाक, ग्रामस्थ

कोसबाड ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव जानेवारी महीन्यात पंचायत समितीने जिल्हापरिषदेकडे पाठवण्यात आला आहे. जिल्हा परिषेकडून ठराव घेऊन प्रस्ताव कमिशनर ऑफिसला जातो. कमिशनर ऑफिसकडून तो शासनाकडे प्रस्तावित होतो. ही प्रक्र ीया सुरु असून त्यावर लवकरच निर्णय होईल. -बी. एच. भरक्षे गट विकास अधीकारी डहाणू

कैनाड ग्रामपंचायत विभाजनाबाबत प्रस्ताव डहाणू गट विकास अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. - राहुल सारंग, तहसीलदार डहाणू

Web Title: The boycott of the elections since 1995, awaiting the clearance of Kosbad division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.