खरिपाच्या भातशेतीला बैल देवाणघेवाणीची कृषी परंपरा; पैसा वा भाताच्या स्वरूपात मोबदला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 12:37 AM2019-06-23T00:37:05+5:302019-06-23T00:37:25+5:30

किनारपट्टीतील शेतकऱ्यांचे बैल, खरीप हंगामाकरिता डोंगरपट्टीतील शेतकऱ्यांकडे काबाडाकरिता घेऊन जाण्याची परंपरा आजही तशीच आहे.

 Agricultural tradition in bordi | खरिपाच्या भातशेतीला बैल देवाणघेवाणीची कृषी परंपरा; पैसा वा भाताच्या स्वरूपात मोबदला

खरिपाच्या भातशेतीला बैल देवाणघेवाणीची कृषी परंपरा; पैसा वा भाताच्या स्वरूपात मोबदला

Next

- अनिरुध्द पाटील
बोर्डी - किनारपट्टीतील शेतकऱ्यांचे बैल, खरीप हंगामाकरिता डोंगरपट्टीतील शेतकऱ्यांकडे काबाडाकरिता घेऊन जाण्याची परंपरा आजही तशीच आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे हा बैलांचा सौदा करण्याची पद्धती शेतीला पूरक असून दोन्ही शेतकरी कुटुंबाकरिता फायदेशीर ठरत आहे. यंदा एका बैलाचा मोबदला दोन हजार रु पये आहेत.
तालुक्यात खरीप हंगामातील भात लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. भौगोलिक दृष्टिकोनातून तालुक्यातील शेतीचे समुद्रकिनाºयालगत आणि डोंगरीपट्यातील अशी ढोबळमानाने दोन प्रकारची वर्गवारी करण्यात येते. किनाºयालगतची जमीन सपाट असल्याने चिखलणीसाठी पूर्वी बैलांचा तर हल्ली पॉवर टीलरचा वापर केला जातो तर डोंगराळ भागात खडकाळ आणि उतरणीची जमीन असल्याने येथे यांत्रिक शेतीला मर्यादा असून आजही बैलांच्या माध्यमातून शेती होते.
दरम्यान पावसाळ्यात किनारी भागात पेरणी आणि लावणी वगळता बैलांचा वापर होत नाही. शिवाय शेत व पाणथळ जमिनीमुळे जनावरांकरिता गुरचरणाकरिता मर्यादा येतात. त्यांच्या संगोपनाकरिता मनुष्यबळ, वेळ आणि पैसा खर्ची घालावा लागतो. त्यामुळे शेतीला आवश्यक जनावरांच्या व्यतिरिक्त अन्य जनावरांचे संगोपन करणे हा शेतकºयांपुढे प्रश्न असतो. उलटपक्षी डोंगरी भागात खाद्याची मुबलकता अधिक असून त्यांना बैलांची आवश्यकता असते. त्यामुळे किनारपट्टीतील शेतकºयांचे बैल या चार महिन्यांकरिता काबाडाकरिता घेऊन त्या बदल्यात पैसे, धान्य वा पावळी देण्याचा सौदा करण्याची येथे शतकीय परंपरा दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे या दोन भागातील कुटुंबियांमध्ये स्नेहाचे वातावरण तयार होते.

डी प्लस झोनचा फायदा फक्त उकळला
जून महिन्याच्या प्रारंभी डोंगरपट्टीतील अनेक आदिवासी शेतकरी बैलांच्या शोधात किनारी भागात येतात. येथून बैल घेऊन गेल्यावर त्यांच्याकडून पेरणी व लावणीकरिता चिखलणीची कामे करून घेतली जातात. या ठिकाणी पाठविले जाणारे बैल उखळणीच्या कामाकरिता अप्रशिक्षित असल्याने तेथे त्यांना प्रशिक्षण दिले जाते. हा बैल येताना धण्याकरिता पैसे, भात किंवा पावळी घेऊन येत असल्याने त्याचे जंगी स्वागत होते. पाहुणा खूप दिवसांनीं माघारी परतल्याने या शेतकरी कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी तरारलेले असते. तर त्याच्या सान्निध्यात एवढे महिने घालविल्याने त्याला माघारी सोडताना त्या शेतकºयांची मनस्थिती भावूक झालेली असते. यावेळी शेजारचे दोन्ही शेतकºयांची समजूत घालतात.
 

Web Title:  Agricultural tradition in bordi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.