सत्तेत आल्यानंतर भाजपाने विकास नव्हे तर विनाश केला - विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 02:30 AM2018-05-23T02:30:31+5:302018-05-23T02:30:31+5:30

दिलेली आश्वासने भाजपला पूर्ण करता आलेली नाहीत. त्यामुळेच केवळ लोकांची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.

After coming to power, the BJP did not destroy, but development - Sankhe | सत्तेत आल्यानंतर भाजपाने विकास नव्हे तर विनाश केला - विखे

सत्तेत आल्यानंतर भाजपाने विकास नव्हे तर विनाश केला - विखे

googlenewsNext


बोईसर : भाजपाने विकासाचे स्वप्न दाखवून २०१४ मध्ये लोकांची मते घेऊन सत्ता मिळविल्या नंतर त्यांनी विकास नव्हे तर विनाश सुरु केला असल्याने कोकण किनारपट्टीवर ही संतप्त भावना असून येत्या काळामध्ये भाजप सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला .
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील कॉंग्रेस आघाडीचे संयुक्त उमेदवार दामोदर शिंगडा यांच्या प्रचारार्थ बोईसर येथील वंजारी समाज सभागृहामध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र व राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष सर्वच आघाड्यावर संपूर्णपणे अपयशी ठरला आहे.
दिलेली आश्वासने भाजपला पूर्ण करता आलेली नाहीत. त्यामुळेच केवळ लोकांची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. लोकांचा विरोध झुगारूनही वाढवण बंदर, नाणार रिफायनरीसारखे प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना देखील भाजपच्या या पापात सहभागी असून, या प्रकल्पांना असलेला त्यांचा विरोध तोंडदेखला आहे. त्यामुळे शिवसेना कितीही नाकारत असली तरी या पापातील आपला सहभाग त्यांना टाळता येणार नाही.
ते पुढे म्हणाले की, भाजप-शिवसेनेचे हे सरकार बुलेट ट्रेन, बडोदा एक्सप्रेस-वेसारखे प्रकल्प आदिवासींवर लादते आहे. या प्रकल्पांमुळे आदिवासी, शेतकरी आणि मच्छीमारांवर मोठा अन्याय होणार असतांनाही भाजप आणि शिवसेनेचे सरकार याची दखल घ्यायला तयार नाही.
त्यामुळेच या दोन्हीही पक्षांच्या विरु ध्द जनतेत प्रचंड रोष असल्याचे वारंवार दिसून आले आहे. नागरिकांमधील हा रोष लक्षात येत असल्याने अच्छे दिन आणण्याचे भाजपचे आश्वासन खोटे ठरले असून, आता उमेदवार सुध्दा इतर पक्षातून आयात करण्याची वेळ भारतीय जनता पक्षावर ओढवल्याची बोचरी टीका विखे पाटील यांनी याप्रसंगी केली.
या सभेला काँग्रेस आघाडीचे उमेदवार दामोदर शिंगडा, विधान परिषदेचे आमदार आनंद ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, विनायकराव देशमुख, यशवंत हाप्पे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केदार काळे, प्रदेश सचिव मनिष गणोरे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष दिवाकरराव पाटील, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संगीताताई धोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अनिल गावड,बोईसर शहराध्यक्ष रणबीर शर्मा, हनुमान सिंग, अरविंद सिंग क्षित्रय, सुभाष
पाटील, संजय ज पाटील, मनिषाताई सावे, चंद्रकांत जाधव, जगन्नाथ पावडे, कर्णा त्रिवेदी, रामदास जाधव आदी नेते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. रणरणत्या उन्हातही सभेला चांगली उपस्थिती होती.

Web Title: After coming to power, the BJP did not destroy, but development - Sankhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.