६१ गाव पाड्यात पाणीबाणी

By admin | Published: April 26, 2017 12:03 AM2017-04-26T00:03:54+5:302017-04-26T00:03:54+5:30

मोखाडा तालुक्यातील पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस जीवघेणी होत चालली आहे. येथील ६१ गावपाड्यांना भीषण तिचा सामना करावा लागत

61 water pumps in the village | ६१ गाव पाड्यात पाणीबाणी

६१ गाव पाड्यात पाणीबाणी

Next

रवींद्र साळवे / मोखाडा
मोखाडा तालुक्यातील पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस जीवघेणी होत चालली आहे. येथील ६१ गावपाड्यांना भीषण तिचा सामना करावा लागत असून धामणशेत बेहटवाडी उंबरपाडा सावरपाडा रामडोह नाशेरा कुवरची वाडी या सात गावपाड्यांचे प्रस्ताव तहसील कार्यालयात धूळ खात पडले आहेत.
मोखाड्यातील ६१ गाव पाडे पाणीटंचाईग्रस्त असून त्यापैकी थोड्याच गावपाड्यांना १९ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या दिवसा गणिक वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली गेल्या वर्षी जून महिन्याच्या पहिल्या हप्त्यात टंचाई ग्रस्त गावपाड्याची संख्या ९० च्या आसपास होती परंतु यावर्षी मात्र टंचाईग्रस्त गावपाडयाची संख्या शंभर वर पोहचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विहिरी कोरड्या पडल्याने टेंभीखोडावेवर दुष्काळाचे सावट
सफाळे : या विभागातील टेंभीखोडावे, कांद्रे, विठ्ठलवाडी या गावातपाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. भर उन्हाळ्यात गावातील महिला व मुलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. गावातील तिन्ही विहीर कोरड्या पडल्या आहेत. महिलांना तासनतास पाणी भरण्यासाठी रांगेत उभे रहावे लागते. टेंभीखोडावे व त्या लगतच्या परिसरातील कुटुंबातील प्रत्येकाला पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे.
या गावाची लोकसंख्या सुमारे २३०० ते २४०० च्या घरात आहे. गावात ३ विहीरी असून सर्व नागरिकांना त्यांच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. उन्हाळा चालू होताच त्या कोरड्या पडण्यास सुरुवात होते. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विहिरीचे पाणी आटले आहे. पाणी भरण्यासाठी येथील महिलाना २-३ तास वाट पहावी लागते. गेल्या वर्षी ग्रामपंचायतीने गावात बोअरवेल खोदली होती, तीही कोरडी पडली आहे.
गावातील जनावरांना देखील पिण्यासाठी पाणी नाही. गावातील महिलांना कपडे धुण्यासाठी गावा लगत असणाऱ्या तलावावर जावे लागत होते. परंतु यंदा तो ही आटला आहे. सफाळे उंबरपाडा ग्रामपंचायतीने काही वर्षापूर्वी सुरू केलेल्या शुद्ध पेय जल योजने मधून पाण्याचे जार विकत आणून स्थानिकांना सध्या स्वता:ची तहान भागवावी लागते.

Web Title: 61 water pumps in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.