युवकांनी आरोग्य जोपासून समाजाला चालना द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:19 PM2017-09-11T23:19:52+5:302017-09-11T23:20:07+5:30

कॅन्सरसारख्या असाध्य आजारावर मात करण्यासाठी या शिबिराचे माध्यमातून गावखेड्यातील लोकांना दिलासा मिळत आहे.

The youth should give their health to the community | युवकांनी आरोग्य जोपासून समाजाला चालना द्यावी

युवकांनी आरोग्य जोपासून समाजाला चालना द्यावी

Next
ठळक मुद्देरामदास तडस यांचे प्रतिपादन : आरोग्य शिबिरात तीन हजार रुग्णांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : कॅन्सरसारख्या असाध्य आजारावर मात करण्यासाठी या शिबिराचे माध्यमातून गावखेड्यातील लोकांना दिलासा मिळत आहे. शरीर कमाविण्यासाठी आखाड्यांची फळी उभी राहिली. निरोगी जीवनासाठी प्रेरणा मिळाली. त्यामुळे समाजातील युवकांनी आजारमुक्त जीवन व्यतीत करून देशाला बलवान बनवावे व समाजाला चालना देण्याचे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.
पं. दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी आरोग्य मॅराथॉन शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. शिबिरात तीन हजार रूग्णांची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे हे अध्यक्षस्थानी होते. अतिथी म्हणून शिबिर संयोजक अविनाश देव, जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे, नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद मदनकर, सभापती कल्पना ढोक, सारिका लाकडे, सुनिता बकाणे यांची उपस्थिती होती.
या शिबिरात स्त्रीरोग, हृदयरोग, कॅन्सर, दंतरोग, नेत्र, सर्जरी कान, नाक, घसा आदी आजारांचे निदान करुन उपचार केले. आतापर्यंत जिल्ह्यात आयोजित ३९ आरोग्य शिबिरात ९३ हजार लोकांनी तपासणी व उपचार करण्यात आले असून १२ हजार लोकांना मोफत चष्मा वाटप, ३५ हजार लोकांच्या मोतीबिंदु शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया तसेच किडनीची शस्त्रक्रिया करण्यात आली. शिबिरात ४२२ महिलांमध्ये गर्भाशय व स्तनाचा कॅन्सर व ३२ पुरूषांमध्ये गळ्यांचा कॅन्सर हा आजार आढळून आला असून या सर्वांवर उपचार करण्यात येत आहे, अशी माहिती अविनाश देव यांनी दिली. जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्रातील दोन लाख लोकांना आरोग्य शिबिराचा लाभ मिळावा या हेतुने प्रयत्न होत आहे. पालकांनी जि.प. च्या माध्यमातून शिबिरासाठी फंड उभा करून रूग्णांना दिलासा देण्यात येत आहे, असे मत बकाणे यांनी व्यक्त केले.
संचालन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल चोपडा यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा महामंत्री अजिंक्य तांबेकर यांनी केले. कार्यक्रमाला जि.प. महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, समाज कल्याण सभापती गजाम, वर्धा पं.स. सभापती महानंदा ताकसांडे, नगरसेवक नंदु वैद्य, मिलिंद ठाकरे, संध्या कारोटकर, सुनिता ताडाम, संगीता तराळे, मारूती मरघाडे, अ. नईम आदींची उपस्थिती होती.

Web Title: The youth should give their health to the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.