एकबुर्जी शिवारात ‘वॉश आऊट’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:25 AM2019-01-20T00:25:34+5:302019-01-20T00:26:15+5:30

खरांगणा (मो.) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकबुर्जी शिवारातील नाल्याच्या काठावर गावठी दारूची निर्मिती करून त्याची परिसरातील गावांमध्ये विक्री केली जात असल्याची तक्रार दारूबंदीसाठी कार्य करणाऱ्या काही महिलांनी खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्याकडे केली.

'Wash Out' campaign at Aakuburi Shivaraya | एकबुर्जी शिवारात ‘वॉश आऊट’ मोहीम

एकबुर्जी शिवारात ‘वॉश आऊट’ मोहीम

Next
ठळक मुद्दे२.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त : महिलांच्या तक्रारींची ठाणेदारांकडून दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खरांगणा (मो.) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकबुर्जी शिवारातील नाल्याच्या काठावर गावठी दारूची निर्मिती करून त्याची परिसरातील गावांमध्ये विक्री केली जात असल्याची तक्रार दारूबंदीसाठी कार्य करणाऱ्या काही महिलांनी खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्याकडे केली. सदर तक्रारीची ठाणेदारांकडून दखल घेण्यात आली. शिवाय छापा टाकून करण्यात आलेल्या कारवाईत गावठी दारूसह दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण २ लाख ४२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात दारूबंदी असताना एकबुर्जी शिवारात गावठी दारूची निर्मितीकरून त्याची विक्री परिसरातील गावांमध्ये केली जात असल्याने त्याचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागतो. दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजाणीसह महिलांची समस्या लक्षात घेता तात्काळ योग्य कारवाई करण्याची मागणी दारूबंदी महिला मंडळाच्यावतीने ठाणेदार संतोष शेगावकर यांच्याकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेवून ठाणेदार शेगावकर यांच्या प्रत्यक्ष हजेरीत एकबुर्जी शिवारातील वानखेडे यांच्या शेताशेजारी असलेल्या नाल्या शेजारी सुरू असलेल्या दारूभट्टीवर खरांगणा पोलिसांनी छापा टाकला. याप्रसंगी पोलिसांनी दारूविक्रेता मनोहर सलामे याला ताब्यात घेवून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गावठी दारू, कच्चा मोहरसायन सडवा, दारू गाळण्याचे साहित्य व दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारा एम.एच. ३१ सी.व्ही. ६३३९ क्रमांकाचा आॅटो असा एकूण २ लाख ४२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी खरांगणा (मो.) पोलीस ठाण्यात आरोपी मनोहर सलामे, कवडू उर्फ सुनील इरपाचे दोन्ही रा. एकबुर्जी आणि निखिल श्रीरामे व राकेश भांडवे दोन्ही रा. पाचोड यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मनोहर याला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध खरांगणा पोलीस घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष शेगावकर, पोलीस कर्मचारी किशोर अप्तूरकर, किरण बोरसरे, गणेश गायकी, शशीकांत मुंडे, अमर हजारे, दिनेश गायकवाड आदींनी केली. कारवाईदरम्यान एकबुर्जी येथील उमेश सलामे, नयन लांडगे, शुभम मडावी, आकाश नागोसे, मंगेश सलामे आदींची उपस्थिती होती.

Web Title: 'Wash Out' campaign at Aakuburi Shivaraya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.