दोन पोलिसांना बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:00 PM2019-04-29T23:00:39+5:302019-04-29T23:01:22+5:30

नजिकच्या कात्री या गावातील आठवडी बाजारात मासेविक्रेते बाजार आटोपल्यावर आपल्या व्यवहारातील पैशाचा हिशोब जुळवत बसले होते. यादरम्यान अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचाऱ्यांनी या मासेविके्रेत्यांकडे धाव घेत जुगाराचे पैसे समजून ते हिसकावून घेत मारहाण केली.

Two police officers have been charged | दोन पोलिसांना बदडले

दोन पोलिसांना बदडले

Next
ठळक मुद्देकात्रीच्या आठवडी बाजारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : नजिकच्या कात्री या गावातील आठवडी बाजारात मासेविक्रेते बाजार आटोपल्यावर आपल्या व्यवहारातील पैशाचा हिशोब जुळवत बसले होते. यादरम्यान अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचाऱ्यांनी या मासेविके्रेत्यांकडे धाव घेत जुगाराचे पैसे समजून ते हिसकावून घेत मारहाण केली. त्यामुळे संतप्त मासेविक्रेत्यांसह काही गावकऱ्यांनी या दोन्ही पोलीस कर्मचाºयांचा चागलेच बदडले. ही घटना रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.
कात्री येथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो. लगतच्या नदीपात्रातून मासेमारी करुन आलेले मासे या बाजारात विक्रीसाठी ठेवले जातात. रविवारी सुद्धा मासेविक्रेत्यांनी बाजारात मासे विकले. रात्री साडेआठ वाजता दरम्यान बाजार झाल्यानंतर सर्व मासेविक्रेते एकत्र येऊन आपल्या व्यवहारातील हिशोबाजी जुळवा-जुळव करीत होते. तेवढ्यात अल्लीपूर पोलीस ठाण्यातील शिपाई सचिन सुरकार व राजरत्न खडसे हे दोघे आठवडी बाजारात आले. त्यांना मासेविक्रेते एकत्र येऊन पैशाची देवान-घेवान करताना दिसून आल्याने त्यांनी जुगाराचे पैसे समजून ते हिसकावित काही मासेविक्रेत्यांना दमदाटी व मारहाण केली. दिवसभर बाजारात उन्हातान्हात मेहनत करुन थकलेले मासेविक्रेते या पोलीस कर्मचाºयांना समजविण्याचा प्रयत्न करीत होते. पण, पोलीस कर्मचारी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलीस कर्मचाºयांची ही दंडेली पाहून उपस्थित नागरिकांनीही मासेविक्रेत्यांची बाजू घेत कर्मचाºयांना समजविण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही कर्मचाºयांनी काहींना धक्काबुक्की व धाकदपट करुन पैसे घेऊन पोबारा करण्याचा पवित्रा घेतला. अखेर कर्मचाºयांच्या या गुंडागर्दीमुळे साऱ्यांचाच तोल सुटल्याने दोघांनाही चांगलाच चोप दिला. तसेच या प्रकरणाची अल्लीपूर पोलिसांना माहितीही देण्यात आली. तेव्हा सचिन सुरकार व राजरत्न खडसे हे दोघेही कर्तव्यावर नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
हे दोघेही कर्तव्यावर असताना आणि नसतानाही हप्ता वसुलीकरिता नेहमीच परिसरात फिरत असल्याची चर्चा रंगली आहे. कर्तव्यावर नसतानाही आठवडी बाजारात जाऊन दाखविलेली कर्तव्य दक्षता कशासाठी? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
भोई समाज क्रांती दलाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
मासेमारी करुन परिवाराचा सांभाळ करणाऱ्या मोसविक्रेत्यांचा काहीही दोष नसताना त्यांना जुगारी समजून मारहाण करीत पैसे हिसकाविणारे अल्लीपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सचिन सुरकार व राजरत्न खडसे यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्यावतीने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. तसेच कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही जिल्हाध्यक्ष प्रमोद हजारे यांनी दिला आहे.
भारसवाडा शिवारात पोलिसावर जीवघेणा हल्ला
तळेगाव (शा.पंत)- नेहमीप्रमाणे आपले कर्तव्य बजावून रात्री दुचाकी घरी जात असलेल्या पोलीस कर्मचाºयावर अज्ञान युवकांनी प्राणघातक हल्ला चढविला. ही घटना रविवारी रात्री भारसवाडा शिवारात घडली असून पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावला. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. निलेश पेटकर, असे पोलीस कर्मचाºयाचे नाव आहे. ते तळेगाव (श्या.पं.) येथे कार्यरत असून रविवारी रात्री कामकाज आटोपून आष्टी येथे आपल्या घरी जात होते. दरम्यान भारसवाडा शिवारात मागाहून आलेल्या दोन दुचाकीवरील युवकांनी त्यांना जबर मारहाण केली. चारही युवक तोंडाला बांधून असल्यामुळे त्यांना ओळखता आले नाही. पेटकर यांनी आष्टी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रविवारी हे दोन्ही कर्मचारी कर्तव्यावर नव्हते. पण, आठवडी बाजारात झालेल्या प्रकाराबाबत कर्मचाºयांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी काही लोकांना ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे. तपासाअंती या प्रकरणातील खरी माहिती पुढे येईल.
- प्रविण डांगे, पोलीस निरीक्षक, अल्लीपूर.

Web Title: Two police officers have been charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.