महामंडळाच्या बसमधूनही होते दारूची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:46 AM2017-09-13T00:46:59+5:302017-09-13T00:46:59+5:30

खरांगणा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून काटोल-आजनसरा बसला नाकेबंदी करून झडती घेण्यात आली. बसमध्ये ४०० नग विदेशी दारूच्या शिशा आढळून आल्या.

The transportation of alcohol through the corporation bus also came from | महामंडळाच्या बसमधूनही होते दारूची वाहतूक

महामंडळाच्या बसमधूनही होते दारूची वाहतूक

Next
ठळक मुद्देकाटोल-आजनसरा बसमधून दारू जप्त : पाच आरोपींना अटक, ४१ हजारांचा दारूसाठा

लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : खरांगणा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून काटोल-आजनसरा बसला नाकेबंदी करून झडती घेण्यात आली. बसमध्ये ४०० नग विदेशी दारूच्या शिशा आढळून आल्या. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून चार आरोपी जबलपूरचे तर एक आरोपी वर्धेचा आहे.
आरोपी प्रीती सुनील जाट (२०), चांदनी गुलजारी जाट (२६), आशिष शिवनारायण जाट (२६) व राजेंद्र रामकुमार जाट (२५) सर्व रा. कंजर मोहल्ला नर्मदा मंदिर मागे जबलपुर आणि राखी मधुकर कंजर जाट (४०) रा. कंजर मोहल्ला इतवारा वर्धा हे जबलपूर येथून दारूसाठा बॅगमध्ये भरून काटोलला रेल्वेने आले होते. यानंतर त्यांनी काटोल-आजनसरा, खरांगणा मार्गे जाणाºया बस क्र. एमएच ४० एन ९५४७ मध्ये दारूसाठ्यासह प्रवास सुरू केला. दरम्यान, जमादार गजानन बावणे यांना बसने दारू येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यावरून त्यांनी खरांगणा बस स्थानकाजवळ कठडे लावून नाकाबंदी केली. बसची झडती घेतली ४१ हजारांच्या दारसाठ्यासह पाच आरोपी मिळून आले. पाचही आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई), ७७ (अ), ८३ अन्वये गुन्हा दाखल कण्यात आला. ही कारवाई जमादार गजानन बावणे, राजेश शेंडे, प्रज्ञा नाखले, प्रवीण गुडवार यांनी केली.
कारसह ६.५० लाखांचा दारूसाठा जप्त
वर्धा - चार चाकी वाहनातून दारू आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून कांढळी चौरस्ता येथे सापळा रचून कारसह ६ लाख ५० हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
गोंडप्लॉट येथील कमल शर्मा हा त्याच्या साथीदारासह वर्धा शहरात कार क्रमांक एमएच ३२ वाय २९८९ ने दारू आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून कांढळी चौरस्ता येथे सापळा रचण्यात आला. सदर कारची झडली घेतली असता विदेशी दारू आढळून आली. यात कारसह ६ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी कमलकिशोर चंद्रीकाप्रसाद शर्मा (२६) रा. गोंडप्लॉट व धर्मा राजू लोंढे (२०) रा. अशोक नगर वर्धा विरूद्ध सिंदी (रेल्वे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस व पोलीस उपअधीक्षक (गृह) सुभाष सावंत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या उदससिंग बारवाल, परवेज खान, दिवाकर परिमल, अमर लाखे, आनंद भस्मे, अनुप कावळे यांनी केली.
 

Web Title: The transportation of alcohol through the corporation bus also came from

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.