जीएसटीच्या विरोधात व्यापारी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:32 PM2017-09-18T23:32:22+5:302017-09-18T23:32:46+5:30

जीएसटीला विरोध दर्शविण्यासाठी तसेच जीएसटीतील विविध जाचक अटी रद्द करून त्यात सुधारणा करण्यात यावी.

Trader Aggressive against GST | जीएसटीच्या विरोधात व्यापारी आक्रमक

जीएसटीच्या विरोधात व्यापारी आक्रमक

Next
ठळक मुद्देप्रतिष्ठाने ठेवली बंद : जिल्हाधिकाºयांमार्फत केंद्र सरकारला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जीएसटीला विरोध दर्शविण्यासाठी तसेच जीएसटीतील विविध जाचक अटी रद्द करून त्यात सुधारणा करण्यात यावी. या मागणीसाठी सोमवारी शहरातील व्यापाºयांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. सदर आंदोलनादरम्यान व्यापाºयांनी जिल्हाधिकाºयांमार्फत खासदार, आमदार यांच्यासह केंद्राला निवेदन पाठविले.
जीएसटी परिवर्तन व्यापारी एकता संघटनाच्या नेतृत्वात सकाळी १०.३० वाजता शहरातून मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा ११ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. निवेदनातून वस्तू व सेवा कर प्रणालीत व्यापाºयांच्या हितार्थ निर्णय घेत काही जाचक अटी रद्द करण्यात याव्या. या मागणीसह विविध मागण्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकाºयांना निवेदन देताना अनिल केला, गणेश देवानी, पुरुषोत्तम भुतडा, शब्बार भाई, शालिग्राम टिबडीवार, रवी शेंडे, राज कृपलानी, नितीन होरा, अरूण काशिकर आदींची उपस्थिती होती.
बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
व्यापाºयांच्या बंदच्या आवाहनाला शहरातील व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दुपारी १२ पर्यंत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली.

Web Title: Trader Aggressive against GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.