दादांची अलिप्तता ठरली चर्चेचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:14 PM2019-03-30T22:14:25+5:302019-03-30T22:15:48+5:30

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत माजी खासदार प्रभाताई राव यांचा जिल्हा अशी काँग्रेसच्या वर्तुळात ओळख असलेल्या वर्धा मतदारसंघात १९९९ नंतर पहिल्यांदाच राव कुटुंबातील सदस्य असलेल्या अ‍ॅड. चारूलता टोकस यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

The topic of discussion was the absence of the grandfather | दादांची अलिप्तता ठरली चर्चेचा विषय

दादांची अलिप्तता ठरली चर्चेचा विषय

Next
ठळक मुद्देप्रभातार्इंचा खरा वारसदार मैदानात । सुभेदारांच्या मनात भरली भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत माजी खासदार प्रभाताई राव यांचा जिल्हा अशी काँग्रेसच्या वर्तुळात ओळख असलेल्या वर्धा मतदारसंघात १९९९ नंतर पहिल्यांदाच राव कुटुंबातील सदस्य असलेल्या अ‍ॅड. चारूलता टोकस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चारूलता टोकस यांचे मावस बंधू असलेले आमदार रणजित कांबळे यांच्यावर त्यांच्या प्रचाराची जबाबदारी येऊन पडलेली आहे. प्रभातार्इंनी आपल्या हयातीतच रणजितदादांना राजकीय वारसदार मानले. सरपंच ते राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास झाला. आता तार्इंच्या खऱ्या वारसदार राजकारणात प्रवेश करू पाहत आहेत. मात्र, गेल्या पाच- सात दिवसांपासून दादा प्रचारात कुठेही दिसले नाही. त्यामुळे येणारा प्रत्येक जण तार्इंना व कार्यकर्त्यांना दादा कुठे? अशीच विचारणा करीत आहे. चारुलता टोकस यांना निवडणूक लढविण्याचा फारसा अनुभव नाही. त्यांच्या आई हयात असताना वर्धा जिल्हा परिषदेची निवडणूक त्या लढल्या होत्या. त्या ज्या भागातून निवडून आल्या, तो भाग प्रभाताई राव यांचा बालेकिल्ला होता. आता या बालेकिल्ल्यावर प्रभातार्इंचा बहिणलेक आमदार रणजित कांबळे यांनी आपले साम्राज्य निर्माण केले आहे. या साम्राज्याला चारूताई निवडून आल्यास सुरूंग लागेल, अशी भीती दादांच्या असंख्य सुभेदारांना आहेत. त्यामुळे हे सुभेदार आपली एकहाती राजवट संपू देण्याच्या मन:स्थितीत नाहीत. म्हणूनच निवडणुकीच्या ऐन धामधुमीत वर्ध्याचे सद्भावना भवन बंद आहे. यातच काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचा सारा भाग सामावलेला आहे. सद्भावना भवनाने प्रभातार्इंच्या राजकारणाचे व या जिल्ह्याच्या राजकीय इतिहासाचे अनेक पैलू पाहिलेले आहे. ते सद्भावना भवन निवडणुकीच्या धामधुमीत बंद असल्याने काँग्रेसचे अनेक जुनेजाणते लोक प्रचार कुठे दिसत नाही, असे म्हणून आल्यापावली परत जात आहेत.

Web Title: The topic of discussion was the absence of the grandfather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.