तालुक्यातील १८ हजार तूर उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 11:34 PM2018-12-22T23:34:46+5:302018-12-22T23:35:15+5:30

एकर कमी व जादा भावाची हमी असणारे पीक म्हणून तुरीकडे बघितले जाते. परंतु, याच पिकाला सुरूवातीला अनियमित पावसाचा तर आता थंडीचा मारा सहन करावा लागत आहे. अशातच अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर दिसुन येत असल्याचे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

In Tilak, 18 thousand toor producers | तालुक्यातील १८ हजार तूर उत्पादक संकटात

तालुक्यातील १८ हजार तूर उत्पादक संकटात

Next
ठळक मुद्देतूर पिकावर अज्ञात रोगाचे आक्रमण : उत्पादनात होणार घट

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : एकर कमी व जादा भावाची हमी असणारे पीक म्हणून तुरीकडे बघितले जाते. परंतु, याच पिकाला सुरूवातीला अनियमित पावसाचा तर आता थंडीचा मारा सहन करावा लागत आहे. अशातच अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर दिसुन येत असल्याचे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या भागातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.
तालुक्यातील सुमारे १८ हजार शेतकऱ्यांनी यंदाच्यावर्षी तूर पिकाची लागवड केली. तशी नोंदही तालुका कृषी विभागाने घेतली आहे. वेळोवेळी निगा घेतल्याने पिकाची उंचीही बºयापैकी वाढली. सध्या तूर पीक फुलावर व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना अचानक झाडच वाळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील काही दिवसांपासून परिसरात थंडी वाढली आहे. वाढत्या थंडीमुळेच व वातावरणातील बदलामुळेच तूर पीक करपत असल्याचे काही शेतकरी सांगतात. परंतु, वास्तविकता काय आहे याची पाहणी करून तूर उत्पादक शेतकºयांना कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे. अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव आर्वी तालुक्यातील वाढोडा, वागदा, अहिरवाडा, देऊरवाडा, नांदपूर, सर्कसपूर, माटोडा, एकलारा, लाडेगाव, टाकरखेड, जळगाव, निंबोली (शेंडे), टोणा, वर्धमनेरी, रोहणा, सालफळ, सायखेडा, दिघी, वडगाव (पांडे), चांदणी, गुमगाव, चिंचोली (डांगे), पिंपळखुटा, दहेगाव, पाचेगाव, बाजारवाडा, हैबतपूर, पिपरी, टोणा आदी शेत शिवारांमधील तूर पिकांवर दिसून येतो. त्यामुळे तेथील तूर उत्पादकांच्या संकटात भर पडली आहे. शिवाय उत्पादनात घट येण्याची भीती वर्तविली जात असून कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.

गेल्या आठ दिवसांपासून थंडी वाढली आहे. इतकेच नव्हे तर आपण यंदा चार एकरात तुरीची लागवड केली. परंतु, अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे सध्या हे पीक वाळत आहे. उपाययोजनांसाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे.
- भास्कर चौकोणे,
शेतकरी, दहेगाव (मु.).

अत्यल्प पाऊस व त्यानंतर वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम तूर पिकावर होत आहे. शेतकºयांनी सायंकाळच्या वेळी तूर पिकाच्या काठावर शेकोटी पेटवावी. १० डिग्रीपेक्षा कमीचे तापमान तूर पिकाला मानवत नाही.
- सतीश सांगळे, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी.

Web Title: In Tilak, 18 thousand toor producers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.