उपबाजारपेठेत शुभारंभालाच ४ हजार ५०० रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:19 PM2017-11-06T23:19:12+5:302017-11-06T23:19:32+5:30

सिंदी (रेल्वे) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू उपबाजारपेठेत सोमवारी सकाळी १०.३१ वाजता कापूस लिलावाचा शुभारंभ सभापती लिलाधर वानखेडे, उपसभापती रामकृष्ण उमाटे यांच्या हस्ते करण्यात आला.

In the sub-market, the price of Rs | उपबाजारपेठेत शुभारंभालाच ४ हजार ५०० रुपये भाव

उपबाजारपेठेत शुभारंभालाच ४ हजार ५०० रुपये भाव

Next
ठळक मुद्देशेतकºयांना दिलासा : लिलाव पद्धतीनेच कापूस विकण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : सिंदी (रेल्वे) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू उपबाजारपेठेत सोमवारी सकाळी १०.३१ वाजता कापूस लिलावाचा शुभारंभ सभापती लिलाधर वानखेडे, उपसभापती रामकृष्ण उमाटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी समितीचे गुणवंत कडू, दिलीप ठाकरे, दिलीप भजभुजे, संदीप वाणी, काशीनाथ लोणकर, कौरती, शीला धोटे व संचालक हजर होते.
शुभारंभाला २५ वाहन कापूस घेऊन शेतकरी हजर झाले होते. लिलावात कापसाचे दर ४ हजार ५११ रुपये निघाले. भारतीय कापूस निगमचे अडते, ग्रेडर हे देखील हजर होते. सीसीआय यांनी तीन वाहनांतील कापूस खरेदी केला. सर्व शेतकºयांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. लिलावामध्ये कापूस व्यापारी साईनाथ टेक्सटाईल्स जुवाडी, साईगोल्ड जिनिंग फॅक्ट्री, एस.आर. जिनिंग फॅक्ट्री, गिरीराज जि. फॅक्ट्री, संस्कार उद्योग सेलू आदींनी भाग घेतला. याप्रसंगी संचालक गुणवंत कडू, संदीप वाणी, शिला धोटे, दिलीप भजभूजे आदी उपस्थित होते. यावेळी सीसीआयनेही कापूस खरेदी केली. यावेळी सभापती वानखेडे यांनी आपला कापूस लिलावाद्वारे विक्री करावा. यातून शेतकºयांना अधिक दर मिळणार आहे. कापूस लिलावातच आणून विकावा. शेतकºयांनी आपला कापूस विक्रीकरिता आणताना चांगला कापूस व हलका कापूस पडदा करून आणावा. यामुळे योग्य दर देणे सोयीचे होते, असे सांगितले.
आमदारांच्या हस्ते शेतकºयांचा सन्मान
वर्धा - सेलू तालुक्यातील जुवाडी येथील साईनाथ टेक्सटाईल प्रा.लि. येथे गुरूवारपासून कापूस खेरदीचा शुभारंभ करण्यात आला. प्रथम कापूस आणणाºया शेतकºयांचा आ.डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी शेतकºयांना शाल-श्रीफळ व स्वेटर देण्यात आले. पहिया दिवशी कापसाला ४३५१ रुपये भाव देण्यात आला. यात ७३ गाड्यांची आवक झाली असून ८५१.५० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. यावेळी प्रेम ग्रोव्हर, जि.प. महिला बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, सेलू पंं.स. सभापती जयश्री खोडे, सेलू तालुका भाजपाचे अध्यक्ष अशोक कलोडे, शिवाजी पाटील, निरज अंसारी, रणजीत काटे, किसान मोर्चाचे विलास वरटकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष हरिष पारसे, जि.प. सदस्य विनोद लाखे, माजी जि.प. सदस्य अरुण उरकांदे, पं.स सदस्य अशोक मुडे, बंडु गव्हाळे, सरपंच प्रीती गव्हाळे, भावना करनाके, छाया दुर्गे, सरला भांडेकर, अभय ढोकणे, नंदा मंगाम, जोत्सना पोहाणे, सुषमा तरवरे, अर्चना सलाम, रवी बेसेकर, शंकर धुर्वे, जीवन येळणे आदी उपस्थित होते.

Web Title: In the sub-market, the price of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.