रस्ता कामात माती मिश्रित रेती वापरल्याने केले काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 10:05 PM2017-11-28T22:05:47+5:302017-11-28T22:06:22+5:30

शहरातील इंदिरा चौक ते गभणे यांच्या घराकडे जाणाºया रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामात मातीमिश्रीत रेतीचा वापर केला जात असल्याची तक्रार करण्यात आली होती.

Stop the work done by using sand mixed sand on the road | रस्ता कामात माती मिश्रित रेती वापरल्याने केले काम बंद

रस्ता कामात माती मिश्रित रेती वापरल्याने केले काम बंद

Next
ठळक मुद्देइंदिरा चौक ते गभणे यांचे घर मार्गावरील प्रकार : अभियंत्यासह पदाधिकाºयांच्या भेटीत गैरप्रकार उघड

आॅनलाईन लोकमत
आर्वी : शहरातील इंदिरा चौक ते गभणे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामात मातीमिश्रीत रेतीचा वापर केला जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. यावरून नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व अभियंत्यांनी कामाला भेट दिली. यात मातीमिश्रीत रेती आढळल्याने काम बंद करण्यात आले.
इंदिरा चौकातून गभणे यांच्या घरापर्यंत तयार होत असलेल्या रस्त्याच्या कामात मातीमिश्रीत रेती वापरली जात आहे. शिवाय गिट्टी वापरतानाही गैरप्रकार केला जात आहे. परिणामी, रस्त्याचे काम निकृष्ट होत आहे. याबाबत संबंधितांकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, न.प. मुख्याधिकारी गणेश शिंदे आणि कनिष्ठ अभियंता साकेत राऊत यांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले. रेती मातीमिश्रीत तर गिट्टीही दिलेल्या मापदंडामध्ये बसत नसल्याचे समोर आले. यामुळे सदर रस्त्याचे काम त्वरित बंद करण्यात आले. दर्जेदार साहित्याचा वापर करून रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेशही कंत्राटदाराला देण्यात आले. शिवाय कंत्राटदाराने मातीमिश्रीत रेती व अन्य साहित्य त्वरित हटवावे, असेही आदेशित करण्यात आल्याचे युवा भीमसेनेचे दिलीप पोटफोडे यांनी सांगितले. याबाबत युवा भीमसेनेद्वारे मुख्याधिकारी शिंदे यांना निवेदन देण्यात आल होते. यावर परिसरातील नागरिकांच्याही सह्या असल्याने पालिका प्रशासनाकडून त्वरित दखल घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. शहरातील प्रत्येक विकास कामांची नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तथा अभियंत्यांनी संयुक्त पाहणी करावी व दर्जेदार कामांसाठी प्रयत्न करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

समुद्रपूर बायपास रस्त्याची समीर कुणावार यांनी केली पाहणी
समुद्रपूर - स्थानिक विकास कामे व्यवस्थित सुरू आहेत काय, याचा मागोवा घेत आ. समीर कुणावार यांनी बायपास रस्त्याची पाहणी केली. यावेळी कामाबद्दल समाधान व्यक्त केले. जाम ते वायगाव हळद्या हा ७ किमी अंतराच्या समुद्रपूर बायपास रस्ता १५ कोटी रुपयांत तयार होत आहे. नागरिकांनी सदर रस्त्याबाबत आ. कुणावार यांच्याकडे निवडणुकीपूर्वीच मागणी केली होती. त्या आश्वासनाची पूर्तता करीत रस्त्याकरिता १५ कोटी रुपये उपलब्ध करून दिले. सदर रस्त्याची पाहणी त्यांनी केली. त्यांच्या समवेत आरमोरीचे आ. गजभे उपस्थित होते. कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करीत वीज वितरण कंपनीचे खांब न हटल्याने तेथूनच अधिकाºयांशी चर्चा करीत खांब हटविण्याच्या सूचना दिल्या. शिवाय संदीप कन्स्ट्रक्शन कंपनीलाही दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पं.स. सदस्य वसंत घुमडे, दिव्या बोरगमवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Stop the work done by using sand mixed sand on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.